अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 21:09 IST2026-04-17T21:06:48+5:302026-04-17T21:09:17+5:30

Amravati Sexual abuse News Latest: अमरावती जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. एसआयटीने गुरुवारी कठोरा नाका रोडवरील त्या फ्लॅटमध्ये जाऊन क्राईम सीन रिक्रिएट केला.

Ayan says he acted within four walls 'with her consent', social media reveals; 'flat' is hotspot for debauchery | अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट

अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट

Amravati Sexual Abuse Case : शांत आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या जिल्ह्याला हादरवून सोडणारे 'व्हिडिओ कांड' आता अधिक गडद होत चालले आहे. परतवाड्याचा मुख्य नराधम अयान अहमद याने केवळ मुलींचे आयुष्यच बरबाद केले नाही, तर अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका भाड्याच्या फ्लॅटला आपल्या पाशवी वासनेचा अड्डा बनवल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. 

कठोरा रोडवरील 'तो' फ्लॅट आता या प्रकरणाचा मुख्य 'हॉटस्पॉट' ठरला असून, त्याठिकाणी चालणाऱ्या कुकृत्याची भीषणता पाहून तपास यंत्रणाही चक्रावून गेली आहे.

एसआयटीने गुरुवारी कठोरा नाका रोडवरील त्या फ्लॅटमध्ये जाऊन क्राईम सीन रिक्रिएट केला. धक्कादायक बाब म्हणजे, मानव सुगंधे या आरोपीने स्वतःच्या नावाने हा फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि तो अयान अहमदला 'तासिका तत्त्वावर' मुलींचे लैंगिक शोषण करण्यासाठी पुरवत होता. या प्रकरणात आता फ्लॅट मालकाचीही कसून चौकशी केली जाणार असून, अमरावतीच्या गजबजलेल्या वस्तीत हे 'सेक्स रॅकेट' कोणाच्या आशीर्वादाने चालत होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस त्या अंगानेही चौकशी करत आहेत.

मोबाईलमध्ये मिळाले १८ व्हिडिओ, ३९ फोटो

पोलिसांकडून जप्त मोबाईलमध्ये आतापर्यंत आठ पीडित मुलींचे १८ अश्लील व्हिडिओ आणि ३९ फोटो सापडले आहेत. यातील काही मुली अल्पवयीन असण्याची दाट शक्यता असल्याने पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात एका विशिष्ट धर्माच्या मुलींनाच लक्ष्य केल्याच्या अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांच्या दाव्यानंतर एसपी विशाल आनंद यांनीही ते मान्य केले.

आरोपीने डिलिट केले व्हिडिओ, फोटोग्राफ्स

पोलिसांनी आरोपींकडून मोबाईलसह लॅपटॉप, टॅब आणि हार्ड डिस्क जप्त केली असून, ती फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली आहे. डिलीट केलेल डेटा रिकव्हर झाल्यास पीडितांचा आकडा आणि आरोपींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कॅफेमधील 'केबीन संस्कृती' पुन्हा चव्हाट्यावर

केवळ फ्लॅटच नाही, तर अमरावती शहरातील दोन कॅफेंमध्येही या नराधमाने मुलींना नेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी अयानने परतवाडा, अचलपूर आणि चिखलदऱ्यातून मुलींना फूस लावून अमरावतीत आणले आणि येथे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. 

विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी गाडगेनगर भागातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघड झाला होता. अयाननेदेखील शहरातील दोन कॅफेंचा अय्याशीसाठी वापर केल्याने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

मानव असा बनला राक्षस

आर्वी येथील मानव हा येथे बीबीए करत आहे. पीयूष नामक तरुणदेखील यापूर्वी तो फ्लॅट अशाच कामासाठी उपलब्ध करून द्यायचा. त्यानंतर त्याने अमरावती सोडले. पीयूषच्या ओळखीतील व्यक्तीने अयानला मानव त्याचा भाड्याचा फ्लॅट तासाप्रमाणे देतो, असे सूचविले. त्यानंतर अयान याने मानवशी संपर्क साधला. त्यानंतर तेथे एक हजार रुपये प्रति तासाप्रमाणे विकृतीचा खेळ सुरू झाला.

Web Title : अमरावती: सोशल मीडिया से शिकार, यौन शोषण के लिए फ्लैट का इस्तेमाल।

Web Summary : अमरावती यौन शोषण मामले से दहला। एक फ्लैट शोषण का अड्डा बन गया, जिसे एक साथी ने व्यवस्थित किया। पीड़ितों, जिनमें कुछ नाबालिग हो सकते हैं, को सोशल मीडिया के माध्यम से लक्षित किया गया। पुलिस फ्लैट मालिक और संभावित व्यापक नेटवर्क की जांच कर रही है।

Web Title : Amravati: Flat used for sexual exploitation; victims lured via social media.

Web Summary : Amravati rocked by a sexual abuse case. A flat became a hotspot for exploitation, arranged by an accomplice. Victims, some potentially underage, were targeted via social media. Police are investigating the flat owner and potential wider network involved.