"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 20:13 IST2026-04-17T20:12:43+5:302026-04-17T20:13:46+5:30
"भाजप सत्तेत आली तर लोकांचे मांस-मच्छी खाणे बंद होईल," या ममता दीदींच्या आरोपाला त्यांनी थेट, कोण किती मांस खाऊ शकतो? याचीच स्पर्धा करण्याचेच चॅलेंज दिले.

"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
आसाममधील विधानसभा निवडणुका आटोपून मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आता थेट पश्चिम बंगालच्या मैदानात उतरले आहेत. बंगालमध्ये येताच त्यांनी 'मांस-मच्छी'च्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान दिले. "भाजप सत्तेत आली तर लोकांचे मांस-मच्छी खाणे बंद होईल," या ममता दीदींच्या आरोपाला त्यांनी थेट, कोण किती मांस खाऊ शकतो? याचीच स्पर्धा करण्याचेच चॅलेंज दिले.
तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी भाजपवर खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा आरोप केला होता. यावर पलटवार करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, आसाममध्ये भाजपचे सरकार येऊन १० वर्षे झाली आहेत. तिथे कामाख्या मंदिरात आजही बळी दिला जातो आणि लोक मांस-मच्छीही खातात. ममता दीदी, तुम्ही आसामला या. आपण स्पर्धा करूया, कोण जास्त मांस खातो. आसामचा भाजप कार्यकर्ता २ किलो मटन खाऊ शकतो, टीएमसी वाले तेवढं खाऊ शकणार नाहीत."
हे मांस मात्र बंद करणार -
हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले, बंगालमध्ये भाजप आल्यावर गोमांस आणि बांगलादेशात होणारी गायींची तस्करी नक्कीच बंद करणार. ममता दीदींना याच गोष्टीची भीती वाटत आहे. तसेच, टीएमसीचे लोक नेमके कोणते मांस खातात? याबद्दल मला शंका आहे, असा बोचरा टोलाही त्यांनी यावेळी ममतांना लगावला.