इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:14 IST2026-04-17T19:13:49+5:302026-04-17T19:14:35+5:30

Turkey Vs Israel: तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यांना आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका म्हटले आहे.

Israeli attacks are now a major threat to global security! Turkish Foreign Minister warns; Appeals to the world... | इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...

इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...

तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी लेबनॉन आणि सीरियामधील इस्रायलच्या वाढत्या लष्करी कारवायांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हे हल्ले केवळ प्रादेशिक नसून आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अंटाल्या डिप्लोमसी फोरममध्ये बोलताना त्यांनी इस्रायलच्या 'विस्तारवादी' धोरणांविरुद्ध जागतिक समुदायाने एकत्र येण्याचे आवाहन केले.

फिदान यांच्या मते, लेबनॉन आणि सीरियासह मध्य पूर्वेतील इस्रायलच्या कारवाया आता प्रादेशिक सीमा ओलांडून जागतिक अस्थिरतेचे मुख्य कारण बनत आहेत. लेबनॉनमध्ये नुकतीच झालेली १० दिवसांची तात्पुरती युद्धबंदी यशस्वीरीत्या लागू होईल आणि भविष्यात त्याचे रूपांतर एका कायमस्वरूपी शांतता करारात होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

विस्तारवादी धोरणांना विरोध
इस्रायल ज्या प्रकारे आपली लष्करी ताकद वापरत आहे, ते आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन असल्याचे सांगत त्यांनी जागतिक समुदायाला याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले.

तुर्कीची भूमिका
तुर्कीने सुरुवातीपासूनच मध्य-पूर्वेतील संघर्षात पॅलेस्टाईन आणि लेबनॉनच्या बाजूने आपली भूमिका मांडली आहे. हाकान फिदान यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने शांततेचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title : इज़रायली हमले वैश्विक सुरक्षा के लिए खतरा: तुर्की मंत्री की चेतावनी

Web Summary : तुर्की ने लेबनान, सीरिया में इज़रायली सैन्य कार्रवाइयों को वैश्विक सुरक्षा के लिए खतरा बताया। मंत्री हाकान फिदान ने इज़रायल की 'विस्तारवादी' नीतियों का विरोध करने और क्षेत्रीय स्थिरता के लिए अंतर्राष्ट्रीय कानून बनाए रखने का आग्रह किया।

Web Title : Israeli attacks a global security threat, warns Turkish Minister.

Web Summary : Turkey warns Israeli military actions in Lebanon, Syria threaten global security. Minister Hakan Fidan urges international community to oppose Israel's 'expansionist' policies and uphold international law for regional stability.