राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 17:51 IST2026-04-17T17:32:39+5:302026-04-17T17:51:00+5:30

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दुहेरी नागरिकत्वाच्या आरोपावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

Rahul Gandhi's problems increase! High Court orders filing of FIR in dual citizenship case | राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश

राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित एका प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी सुनावणीदरम्यान हा आदेश दिला. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले. नागरिकत्वाशी संबंधित आरोपांवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला.

भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण

राहुल गांधी यांच्यावर दुहेरी नागरिकत्व बाळगल्याचा आरोप होता. या प्रकरणी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीनंतर, न्यायालयाने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील दुहेरी नागरिकत्वाच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असे
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने आज निकालात म्हटले आहे. न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला एकतर स्वतः चौकशी करण्याचे किंवा हे प्रकरण केंद्रीय यंत्रणेकडे सोपवण्याचे निर्देश दिले.

विशेष खासदार/आमदार न्यायालयाच्या आदेशाला आव्हान

एफआयआर दाखल करण्याची याचिका फेटाळणाऱ्या लखनौ येथील विशेष खासदार/आमदार न्यायालयाच्या २८ जानेवारीच्या आदेशाला आव्हान देणारे भाजप कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश आला आहे. नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणांवर निर्णय देण्यास आपण सक्षम नाही, असे कनिष्ठ न्यायालयाने म्हटले होते.

कर्नाटकचे रहिवासी असलेल्या याचिकाकर्त्याने, भारतीय दंड संहिता, शासकीय गुप्तता कायदा, परदेशी नागरिक कायदा आणि पासपोर्ट कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून एफआयआर नोंदवण्याची आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Web Title : राहुल गांधी की मुश्किलें बढ़ीं: दोहरी नागरिकता मामले में एफआईआर का आदेश।

Web Summary : इलाहाबाद उच्च न्यायालय ने राहुल गांधी के खिलाफ दोहरी नागरिकता मामले में एफआईआर का आदेश दिया। अदालत ने आरोपों की जांच के निर्देश दिए, संभवतः एक केंद्रीय एजेंसी द्वारा। एक निचली अदालत ने पहले याचिका खारिज कर दी थी, जिसे एक भाजपा कार्यकर्ता ने चुनौती दी थी।

Web Title : Rahul Gandhi's troubles increase: Court orders FIR in dual citizenship case.

Web Summary : Allahabad High Court ordered an FIR against Rahul Gandhi in a dual citizenship case. The court directed investigation into the allegations, possibly by a central agency. A lower court previously dismissed the petition, which a BJP worker challenged.