"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:54 IST2026-04-17T15:33:28+5:302026-04-17T15:54:13+5:30

आम आदमी पार्टीसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, राघव चड्ढा यांनी आज राज्यसभेत आपल्याच पक्षावर जोरदार टीका केली.

"I removed the Deputy Leader..."; Raghav Chadha openly criticized his own party in the Rajya Sabha | "मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य

"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य

आम आदमी पक्षात मागील काही दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू असल्याचे समोर आले. खासदार राघव चड्ढा यांचे उपनेतेपद काढून घेतले, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता चड्ढा यांनी राज्यसभेतील भाषणात आपल्याच पक्षावर टीका केली. पक्षाने चड्ढा यांच्यावर भारतीय जनता पार्टीसोबत संगनमत केल्याचा आरोप आहे.

"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?

१७ एप्रिल रोजी, राज्यसभेच्या उपसभापतीपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आल्याबद्दल हरिवंश नारायण सिंह यांचे अभिनंदन करण्यासाठी राघव चड्ढा सभागृहात उभे राहिले. यावेळी त्यांनी 'आप'च्या नेतृत्वावर निशाणा साधला. ते म्हणाले, "मी ज्या पक्षाचा आहे, त्या पक्षाचे नेते सभागृहात उपस्थित नाहीत. माझ्याच पक्षाचे नवनियुक्त उपनेते सुद्धा सभागृहात उपस्थित नाहीत." त्यानंतर ते उपहासाने म्हणाले, "मी नुकताच पदावरून हटवलेला उपनेता आहे आणि मी सभागृहात उपस्थित आहे. मला बोलण्याची ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद."

"उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्यासोबतचे त्यांचे वैयक्तिक संबंध संमिश्र स्वरूपाचे राहिले आहेत. या कार्यकाळात हे संबंध पूर्णपणे 'मधुर' होतील आणि भविष्यात त्यांना बोलण्यासाठी एक-दोन मिनिटे अधिक मिळतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. चड्ढा यांनी सभापती आणि उपसभापती सी. पी. राधाकृष्णन यांचेही कौतुक केले.  त्यांच्या आगमनापासून शून्य प्रहरात पूर्वी केवळ ५-६ सदस्यांऐवजी आता १५-२० सदस्यांना बोलण्याची संधी मिळत आहे, असेही राघव चड्ढा म्हणाले.

'आप'ने राज्यसभेत उपनेतेपद बदलले

२ एप्रिल रोजी, 'आप'ने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून, राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती केली. सध्या राज्यसभेत 'आप'चे दहा खासदार आहेत. पंजाबमधून ७ आणि दिल्लीमधून ३. लोकसभेत पंजाबचे ३ खासदार आहेत.

Web Title : उपनेता पद से हटाए जाने पर राघव चड्ढा ने राज्यसभा में आप की आलोचना की।

Web Summary : राज्यसभा में आप के उपनेता पद से हटाए जाने के बाद राघव चड्ढा ने खुले तौर पर अपनी पार्टी की आलोचना की, आंतरिक विवादों और भाजपा के साथ मिलीभगत के आरोपों का हवाला दिया। उन्होंने व्यंग्यात्मक रूप से उपसभापति को बधाई देने वाले अपने भाषण के दौरान आप नेताओं की अनुपस्थिति पर ध्यान दिलाया, अपनी बदली हुई स्थिति पर प्रकाश डाला।

Web Title : Raghav Chadha criticizes AAP in Rajya Sabha after deputy leader removal.

Web Summary : Raghav Chadha, after being removed as AAP's deputy leader in Rajya Sabha, openly criticized his party, alleging internal disputes and BJP collusion accusations. He sarcastically noted the absence of AAP leaders during his speech congratulating the Deputy Chairman, highlighting his changed status.