"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:41 IST2026-04-17T16:41:10+5:302026-04-17T16:41:58+5:30

कर्मचाऱ्यांवर नमाज पठणासाठी आणि सक्तीने मांसाहार करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये निदा सक्रिय होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ९ जणांवर एफआयआर दाखल झाला आहे. यामध्ये दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफताब अन्सार आणि शाहरुख शेख यांच्यासह एका महिलेचा समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे. निदा खान ही एकमेव आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

"How far are the threads of this module Will investigate Fadnavis spoke clearly on the corporate conversion case in Nashik, gave big hints | "या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत

"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत


नाशिकमधील टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेसमधील (TCS) धर्मांतर आणि धर्मांतरासाठी मुस्लिमेतर कर्मचाऱ्यांचा अतोनात छळ करणारे रॅकेट उघड झाल्यानंतर, देशातील संपूर्ण कॉर्पोरेट क्षेत्रातच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठे संकेत दिले. "नाशिकमधील हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे.  यासंदर्भात आम्ही अत्यंत कठोर कारवाई करत आहोत. या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास आम्ही करणार आहो," असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ते पश्चिम बंगालमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले फडणवीस? -
यावेळी, एका पत्रकारने देवेंद्र फडणवीस यांना नाशिकच्या धर्मांतरण घटनेसंदर्भात सरकारची भूमिका आणि कारवाई संदर्भात प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, "नाशिकमधील हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यासंदर्भात आम्ही अत्यंत कठोर कारवाई करत आहोत. एका मॉड्यूल अंतर्गत हे सर्व करण्यात आले आहे. कंपनीनेही यात मोठी भूमिका घेतली आहे. कुणालाही पाठीशी न घालण्याची भूमिका टीसीएसने घेतली आहे. टीसीएसच्या प्रमुखांनीही या प्रकरणाची निंदा केली आहे." एवढेच नाही तर, "या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास आम्ही करू. आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांनाही या प्रकरणाची माहिती दिली आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांची मदतही यात घेतली जाईल." असे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

TCS प्रकरणातील मास्टरमाइंड निदा खान फरार? -
TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील मास्टर माइंड निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची चर्चा असून ती महाराष्ट्राबाहेर पळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, निदाच्या काही नातलगांनी यासंदर्भात २-३ वकिलांशी चर्चा केल्याचेही समजते. निदा खानच्या तपासासाठी ३ पथके प्रत्येकी गुजरात, केरळ आणि काश्मीरात रवाना झाली आहेत. तत्पूर्वी, ती भिवंडीत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, सापडली नाही.

याशिवाय, मुंबई येथेही तिचे लोकेशन शोधण्यात आल्याचे समजते. निदा खान ही या प्रकरणातील मास्टर माइंड असून तिने कंपनीतील विशिष्ट धर्मांतील तरुणींना धर्मांतर करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला. तिच्या पुणे येथील घराचीही झडती घेण्यात आली आहे.

धर्मांतरासाठी दबाव -
कर्मचाऱ्यांवर नमाज पठणासाठी आणि सक्तीने मांसाहार करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये निदा सक्रिय होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ९ जणांवर एफआयआर दाखल झाला आहे. यामध्ये दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफताब अन्सार आणि शाहरुख शेख यांच्यासह एका महिलेचा समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे. निदा खान ही एकमेव आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
 

Web Title : नाशिक धर्मांतरण रैकेट: फडणवीस ने जांच के आदेश दिए, बड़े नेटवर्क का संकेत

Web Summary : फडणवीस ने नाशिक टीसीएस धर्मांतरण मामले में सख्त कार्रवाई का आश्वासन दिया। जांच मॉड्यूल की पहुंच का पता लगाएगी, जरूरत पड़ने पर केंद्रीय एजेंसियों की मदद ली जाएगी। मास्टरमाइंड निदा खान फरार; टीमें कई राज्यों में उसकी तलाश कर रही हैं।

Web Title : Nashik Conversion Racket: Fadnavis Orders Probe, Hints at Wider Network

Web Summary : Fadnavis assures strict action in Nashik TCS conversion case. Investigation will uncover the module's reach, with central agencies' help if needed. Mastermind Nida Khan is absconding; teams search for her in multiple states.