Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल

LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल

Gold Silver Shortage News: देशात एलपीजी (LPG) नंतर आता सोने आणि चांदीची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाहा काय आहे यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:07 IST2026-04-17T15:07:47+5:302026-04-17T15:07:47+5:30

Gold Silver Shortage News: देशात एलपीजी (LPG) नंतर आता सोने आणि चांदीची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाहा काय आहे यामागचं कारण?

Will there be a shortage of gold and silver after LPG Indian banks have taken big step stopped import | LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल

LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल

Gold Silver Shortage News: देशात एलपीजी (LPG) नंतर आता सोने आणि चांदीची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय बँकांनी परदेशी पुरवठादारांकडून होणारी सोने आणि चांदीची आयात थांबवली आहे. अनेक टन सोने-चांदी सध्या कस्टम्समध्ये अडकून पडले आहे, कारण या आयातीला अधिकृत करणारा कोणताही औपचारिक सरकारी आदेश अद्याप जारी करण्यात आलेला नाही. रॉयटर्सने व्यापार क्षेत्रातील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. भारत हा जगातील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि चांदीचा सर्वात मोठा खरेदीदार आहे, त्यामुळे नवीन आयात न झाल्यास देशाला मोठ्या टंचाईचा सामना करावा लागू शकतो.

जागतिक किमतींवर आणि रुपयावर होणारा परिणाम

भारतातील मागणी कमी झाल्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या जागतिक किमतींवर होऊ शकतो. दुसरीकडे, यामुळे देशाची व्यापारी तूट कमी होण्यास आणि रुपयाला बळकटी मिळण्यास मदत होऊ शकते. रुपया हे या वर्षातील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या आशियाई चलनांपैकी एक राहिलं आहे. रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी रिफायनरींना त्यांचे 'स्पॉट डॉलर' खरेदी थांबवण्यास सांगितलं आहे.

DGFT च्या आदेशाची प्रतीक्षा

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे परकीय व्यापार महासंचालनालय (DGFT) सामान्यतः प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एक आदेश जारी करते. यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियान सोने आणि चांदी आयात करण्यासाठी अधिकृत केलेल्या बँकांची यादी दिली जाते. मागील आदेश एप्रिल २०२५ मध्ये जारी करण्यात आला होता आणि तो ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षापर्यंत वैध होता. आता बँका DGFT च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांची वाट पाहत आहेत. अद्याप DGFT ने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

चांदीच्या दरात ४७४५ रुपयांची घसरण, सोन्याच्या किमतीतही मोठी घट; पटापट चेक करा नवे दर?

५ टन सोने आणि ८ टन चांदी कस्टम्समध्ये अडकली

बँकांना अशी अपेक्षा होती की DGFT एप्रिलच्या सुरुवातीलाच हा आदेश जारी करेल, मात्र अद्याप कोणताही अपडेट मिळालेला नाही. मुंबईतील एका खाजगी बँकेच्या बुलियन डीलरने सांगितलं की, कस्टम्स क्लिअरन्सअभावी ५ टनांहून अधिक सोनं अडकून पडलं आहे. DGFT च्या आदेशाबाबत अनिश्चितता असल्यानं बँकांनी परदेशी पुरवठादारांना नवीन ऑर्डर देणं बंद केलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे ८ टन आयात केलेली चांदी देखील क्लिअरन्सअभावी अडकली आहे.

Web Title : सोने-चांदी की कमी का खतरा? भारतीय बैंकों ने आयात रोका।

Web Summary : भारत में सोना-चांदी की कमी हो सकती है क्योंकि बैंकों ने सरकारी मंजूरी का इंतजार करते हुए आयात रोक दिया है। टन माल सीमा शुल्क में फंसा है, जिससे वैश्विक कीमतों पर असर पड़ेगा और रुपया मजबूत हो सकता है। डीजीएफटी के आदेश का इंतजार।

Web Title : Gold and silver shortage looming? Indian banks halt imports.

Web Summary : India may face gold and silver shortages as banks halt imports, awaiting government authorization. Tons are stuck in customs, impacting global prices and potentially strengthening the rupee. DGFT order awaited.