Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > चांदीच्या दरात ४७४५ रुपयांची घसरण, सोन्याच्या किमतीतही मोठी घट; पटापट चेक करा नवे दर?

चांदीच्या दरात ४७४५ रुपयांची घसरण, सोन्याच्या किमतीतही मोठी घट; पटापट चेक करा नवे दर?

Gold Silver Price Today: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तापूर्वी सोन्याच्या किमतीत घट पाहायला मिळाली आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:42 IST2026-04-17T14:38:35+5:302026-04-17T14:42:50+5:30

Gold Silver Price Today: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तापूर्वी सोन्याच्या किमतीत घट पाहायला मिळाली आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

Gold Silver Price Today ibja 19 april Silver price drops by Rs 4745 gold price also sees a big drop Check the new rates quickly | चांदीच्या दरात ४७४५ रुपयांची घसरण, सोन्याच्या किमतीतही मोठी घट; पटापट चेक करा नवे दर?

चांदीच्या दरात ४७४५ रुपयांची घसरण, सोन्याच्या किमतीतही मोठी घट; पटापट चेक करा नवे दर?

Gold Silver Price Today: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तापूर्वी सोन्याच्या किमतीत घट पाहायला मिळाली आहे. कालच्या तुलनेत आज शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा दर १,९४७ रुपयांनी कमी झाला आहे. सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही घसरण झाली असून, सोने खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. 'इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन'नं (IBJA) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज १७ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,५१,३५८ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. गुरुवारी दुपारपर्यंत हा दर १,५३,३०५ रुपये होता.

२३ ते १४ कॅरेट सोन्याचे आजचे दर 

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननुसार, इतर कॅरेटच्या सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:

२३ कॅरेट: १,५०,७५२ रुपये प्रति १० ग्रॅम.
२२ कॅरेट: १,३८,६४४ रुपये प्रति १० ग्रॅम.
१८ कॅरेट: १,१३,५१९ रुपये प्रति १० ग्रॅम.
१४ कॅरेट: ८८,५४४ रुपये प्रति १० ग्रॅम.

Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?

चांदीचा आजचा नवा दर

Ibjarates नुसार, आज शुक्रवारी चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. १ किलो चांदीचा दर आता २,४७,९३० रुपये झाला आहे. गुरुवारी दुपारी चांदी २,५२,६७५ रुपये प्रति किलो होती. म्हणजेच चांदीच्या किमतीत ४,७४५ रुपयांची घट झाली आहे.

का घसरले सोन्याचे भाव?

सोन्याच्या किमतीत घट होण्यामागे अनेक कारणे असली, तरी सध्याच्या घसरणीचं मुख्य कारण डॉलरचं वधारलेलं मूल्य हे आहे. गुंतवणूकदार सध्या सोन्याऐवजी डॉलरला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहत आहेत, ज्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ही मोठी हालचाल दिसून येत आहे.

Web Title : अक्षय तृतीया से पहले सोना-चांदी के दामों में भारी गिरावट: नए रेट देखें

Web Summary : अक्षय तृतीया से पहले सोने की कीमतों में भारी गिरावट आई है, 24 कैरेट सोना ₹1,947 नीचे। चांदी में भी ₹4,745 प्रति किलो की महत्वपूर्ण गिरावट देखी गई। कीमतों में गिरावट का कारण मजबूत डॉलर को निवेशकों का आकर्षण बताया जा रहा है।

Web Title : Gold and Silver Prices Plunge Before Akshay Tritiya: Check New Rates

Web Summary : Gold prices fell sharply before Akshay Tritiya, with 24-carat gold down ₹1,947. Silver also saw a significant drop of ₹4,745 per kg. The price drop is attributed to a stronger dollar attracting investors.