Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?

Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?

Wipro Stock Buyback: विप्रो कंपनीच्या १५,००० कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकबाबत (Share Buyback) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पाहा बायबॅकचे अधिक डिटेल्स.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:53 IST2026-04-17T12:53:11+5:302026-04-17T12:53:11+5:30

Wipro Stock Buyback: विप्रो कंपनीच्या १५,००० कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकबाबत (Share Buyback) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पाहा बायबॅकचे अधिक डिटेल्स.

Wipro s rs 15000 crore buyback promoter group will also participate What does this mean for retail investors | Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?

Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?

Wipro Stock Buyback: विप्रो कंपनीच्या १५,००० कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकबाबत (Share Buyback) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या प्रवर्तक गटानं या बायबॅकमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सीएफओ अपर्णा अय्यर यांनी याला दुजोरा दिला असून, प्रवर्तकांचा सहभाग हा कंपनीच्या भविष्यावरील त्यांच्या विश्वासाचा संकेत मानला जातोय.

बायबॅकची किंमत आणि तपशील

कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटलंय की, बोर्डानं २ रुपये फेस व्हॅल्यू असलेले जास्तीत जास्त ६० कोटी फुली पेड अप इक्विटी शेअर्स परत खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा बायबॅक एकूण १५,००० कोटी रुपयांपर्यंतचा असेल आणि यासाठी प्रति शेअर २५० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत १६ एप्रिलच्या बंद भाव (२१० रुपये) पेक्षा सुमारे १९% अधिक (प्रीमियम) आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही ऑफर आकर्षक ठरत आहे.

टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

प्रवर्तकांचा हिस्सा आणि परिणाम

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत विप्रोमध्ये प्रवर्तक आणि त्यांच्या गटाचा हिस्सा ७२.६३% होता. आता प्रवर्तक स्वतः या बायबॅकमध्ये सहभागी होत असल्यानं किरकोळ गुंतवणूकदारांना मिळणारा वाटा थोडा कमी होऊ शकतो, कारण बायबॅकमधील सहभागाची मर्यादा मर्यादित असते. मात्र, प्रवर्तकांचा सहभाग कंपनीच्या प्रगतीबाबत सकारात्मक संकेत देतो.

तिमाही निकालात नफ्यात घट, महसुलात वाढ

विप्रोचे मार्च तिमाहीचे (Q4 FY26) निकाल काहीसे कमकुवत राहिले आहेत. कंपनीचा नफा १.८९% नं कमी होऊन ३,५०१.८ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच काळात तो ३,५६९.६ कोटी होता. तर महसूल ७.६% नं वाढून २४,२३६.३ कोटी रुपये झालाय.

वार्षिक कामगिरी आणि शेअरची स्थिती

संपूर्ण आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीची वाढ संथ राहिली आहे. वर्षभरात नफा केवळ ०.४७% वाढून १३,१९७.४ कोटी रुपये झाला, तर महसूल ३.९६% वाढून ९२,६२४ कोटी रुपये झाला आहे. शेअर बाजारातील स्थितीचा विचार केल्यास, गुरुवारी विप्रोचा शेअर ०.१९% च्या किरकोळ वाढीसह २१०.१५ रुपयांवर बंद झाला. मात्र, या स्टॉकची कामगिरी गेल्या काही काळात निराशाजनक राहिली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : विप्रो का ₹15,000 करोड़ का बायबैक: प्रमोटर भी शामिल, क्या होगा असर?

Web Summary : विप्रो के ₹15,000 करोड़ के बायबैक में प्रमोटरों की भागीदारी, विश्वास का संकेत है। बायबैक मूल्य ₹250 प्रति शेयर है, जो बाजार मूल्य से अधिक है। तिमाही मुनाफा घटा, लेकिन राजस्व बढ़ा। प्रमोटरों की भागीदारी खुदरा निवेशकों की हिस्सेदारी कम कर सकती है।

Web Title : Wipro's ₹15,000 Cr Buyback: Promoters Participate; What It Means?

Web Summary : Wipro's ₹15,000 crore buyback sees promoter participation, signaling confidence. The buyback price is ₹250 per share, a premium over the market price. While quarterly profits dipped, revenue increased. Promoter participation may slightly reduce retail investors' share.