Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:38 IST2026-04-17T12:37:31+5:302026-04-17T12:38:55+5:30

What Happens After Death: मृत्यूनंतर माणसांचे काय होते? हे जगातील सर्वात मोठे रहस्य आहे. मात्र, मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झालेल्या अमेरिकेतील एका महिलेनं जगाला सत्य सांगितले आहे.

What Happens After Death? Woman Who Came Back After 13 Minutes Reveals the Truth About the Other World | Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...

Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...

मृत्यूनंतर काय होते? हे जगातील सर्वात मोठे रहस्य आहे. मात्र, मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झालेल्या अमेरिकेतील एका महिलेनं जगाला सत्य सांगितले आहे. संबंधित महिला १९ वर्षांची असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर १३ मिनिटांनी ती पुन्हा जिवंत झाली. दरम्यान, सबंधित महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेबद्दल माहिती दिली आणि मृत्युनंतर माणसांचे काय होते? हे देखील सांगितले आहे. या महिलेचा हा अनुभव सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लिंडा नावाच्या या महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. मात्र, मृत्युनंतर १३ मिनिटांनी तिचे हृदय पुन्हा धडधडू लागले. हे पाहून स्वत: डॉक्टर आश्चर्यचकीत झाले. यानंतर लिंडाने मृत्युनंतर पुन्हा जिवंत होऊपर्यंत १३ मिनिटांत तिच्यासोबत काय घडले, हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. 

मृत्युनंतर माणसाचे काय होते?

लिंडाने सांगितले की, मृत्यूनंतर तिला जाणवले की, ती तिच्या शरीराच्या बाहेर आली आहे. लिंडाच्या मते, त्या अवस्थेत तिला कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा वेदना जाणवत नव्हत्या. त्याऐवजी तिला अत्यंत शांत वाटत होते. तिला समोर एक तेजस्वी प्रकाश दिसला, जो अत्यंत सकारात्मक होता.  तिने दावा केला की, ती छतावरून डॉक्टरांना आपल्या शरीरावर उपचार करताना स्पष्टपणे पाहू शकत होती. डॉक्टर काय बोलत आहेत आणि तिला वाचवण्यासाठी काय प्रयत्न करत आहेत? हे सर्व तिला दिसत होते. पुढे लिंडा म्हणाली की, तिला एका सुंदर बागेसारख्या ठिकाणी गेल्याचा भास झाला, जिथे सर्वत्र शांतता होती. तिला तिथे काही अशा व्यक्तींचे अस्तित्व जाणवले, जे कदाचित तिचे पूर्वज किंवा मार्गदर्शक असावेत. तिचे म्हणणे आहे की, या घटनेनंतर तिच्या मनातून मृत्यूची भीती पूर्णपणे निघून गेली आहे.

जगभरात संशोधन सुरू

डॉक्टर म्हणाले की, जेव्हा मेंदूला ऑक्सिजन मिळणे बंद होते, तेव्हा अशा प्रकारचे भास होऊ शकतात. मात्र, लिंडाचा हा अनुभव नियर डेथ एक्सपिरियन्स या श्रेणीत येतो, ज्यावर जगभरात अनेक संशोधने सुरू आहेत. सध्या लिंडा पूर्णपणे बरी असून, तिच्या या दाव्याने मृत्यू आणि त्यानंतरच्या जीवनाबद्दलच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले. 

Web Title : मृत घोषित महिला ने मृत्यु के बाद के जीवन का अनुभव बताया।

Web Summary : 13 मिनट के लिए मृत घोषित एक अमेरिकी महिला ने मृत्यु के बाद के जीवन का अनुभव साझा किया। उसने शांति महसूस की, एक तेज रोशनी देखी, और अपने शरीर पर काम कर रहे डॉक्टरों को देखा। उसका मानना है कि उसने एक शांत उद्यान का दौरा किया और आध्यात्मिक मार्गदर्शकों से मिली, जिससे उसका मृत्यु का डर खत्म हो गया।

Web Title : Woman declared dead for 13 minutes recounts afterlife experience.

Web Summary : An American woman, clinically dead for 13 minutes, claims she experienced the afterlife. She felt peace, saw a bright light, and observed doctors working on her body. She believes she visited a serene garden and met spiritual guides, losing her fear of death.