पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:41 IST2026-04-18T13:40:14+5:302026-04-18T13:41:36+5:30

Paneer Seized News: नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर मोठी कारवाई केली आहे. एका धडक कारवाईत तब्बल २,८०० किलोहून अधिक बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे.

Palak Paneer, Kadhai Paneer, Shahi Paneer...; What do you like? You'll stop eating after watching the video! | पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!

पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मेरठमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन बेकायदेशीर कारखान्यांवर धाड टाकून तब्बल २ हजार ८०० किलोहून अधिक भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे पनीर दुधाऐवजी हानिकारक रसायनांचा वापर करून तयार केले जात होते.

मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशासकीय पथकाने मेरठमधील दोन ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईत पनीर बनवण्याचे विदारक वास्तव समोर आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारखान्यांमध्ये दुधाचा अंशही नव्हता; त्याऐवजी घातक रसायने आणि इतर पदार्थांच्या मिश्रणातून हे बनावट पनीर तयार केले जात होते.

तपासादरम्यान असे समोर आले आहे की, या कारखान्यांमधून तयार होणारे भेसळयुक्त पनीर मोठ्या प्रमाणावर दिल्ली आणि एनसीआर परिसरात पुरवले जात होते. हॉटेल, ढाबे आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये हे पनीर विक्रीसाठी पाठवले जात होते. यामुळे अजाणतेपणी हे पनीर सेवन करणाऱ्या हजारो ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या कारवाईत २,८०० किलोहून अधिक भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले. धक्कादायक बाब महणजे, इथे पनीर तयार करण्यासाठी दुधाऐवजी हानिकारक रसायनांचा सर्रास वापर केला जात असल्याचे आढळून आले.

नागरिकांना आवाहन

प्रशासनाने जप्त केलेले पनीर नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली असून नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच, हे पनीर कोणाकोणाला विकले जात होते, त्या वितरणाच्या साखळीचा शोध पोलीस आणि अन्न सुरक्षा विभाग घेत आहे. सणासुदीच्या काळात किंवा वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पनीर सारखे दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी आणि अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title : नकली पनीर रैकेट का भंडाफोड़: रासायनिक पनीर जब्त, स्वास्थ्य चेतावनी जारी

Web Summary : मेरठ में नकली पनीर रैकेट का भंडाफोड़, दूध की जगह हानिकारक रसायनों से बना 2800 किलो पनीर जब्त। मिलावटी पनीर दिल्ली-एनसीआर में सप्लाई, गंभीर स्वास्थ्य जोखिम। उपभोक्ताओं को विश्वसनीय स्रोतों से खरीदने की सलाह।

Web Title : Fake Paneer Racket Busted: Chemical-laden Cheese Seized, Health Alert Issued

Web Summary : Authorities in Meerut busted a fake paneer racket, seizing over 2800 kg of cheese made with harmful chemicals instead of milk. The adulterated paneer was supplied to Delhi-NCR, posing serious health risks. Consumers are urged to buy from trusted sources.