Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 14:54 IST2026-04-18T14:54:19+5:302026-04-18T14:54:34+5:30
TCS Danish Khan: नाशिकमधील TCS कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असून अनेकांना अटकही झाली आहे.

Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
नाशिकमधील TCS कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असून अनेकांना अटकही झाली आहे. मात्र मुख्य आरोपी निदा खान अद्याप फरार आहे. अटक टाळण्यासाठी तिने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. याच दरम्यान टीसीएस कंपनीच्या व्यवस्थापनाने कठोर पाऊल उचलत निदाला निलंबित केलं आहे.
निदा खानवर गंभीर आरोप असून तिने मुलींना टार्गेट करणाऱ्या इतर आरोपींना साथ दिल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दानिश खानही आहे. मात्र आता त्याच्या आईने मुलाला वाचवण्यासाठी समोर येत एक विधान केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी दावा केला की, "माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे. माझा मुलगा एक चांगला माणूस असून त्याच्यावर लागलेले सर्व आरोप खोटे आहेत."
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
"माझा मुलगा धर्मांतर करू शकत नाही"
दानिशचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, तो अभ्यासात आणि कामात नेहमीच अग्रेसर राहिला आहे असा दावा त्याच्या आईने केला. धर्मांतराच्या आरोपांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, "माझा मुलगा कोणाचंही धर्मांतर करू शकत नाही. आमच्या धर्मात अशा प्रकारे धर्मांतर होत नाही, ती प्रक्रिया केवळ धार्मिक नेत्यांच्या माध्यमातूनच पूर्ण होते." नाशिक कंपनी प्रकरणातील महिलांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांनी मुलाची बाजू सावरून धरली.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
"आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
आईने केला मुलाचा बचाव
दानिशच्या आईने सांगितलं की, "मला माझ्या मुलाच्या आणि पीडितेच्या संबंधांबाबत कोणतीही कल्पना नव्हती. जर त्यांच्यात काही संवाद झाला असेल, तर तो पूर्णपणे मैत्रीचा होता." आरोपीच्या आईने स्पष्ट केले की, ती महिला त्याची मैत्रीण होती आणि दानिशने आपल्या पत्नीला या मैत्रीबद्दल आधीच कल्पना दिली होती. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, दानिशची पत्नीने पीडितेशी संपर्क साधून 'तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत' असे सांगितले होते का?
"अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
अडकवल्याचा आरोप
यावर आईने सांगितलं की, कदाचित माझ्या मुलाने आपल्या पत्नीला आधीच सांगितलं असावं की ते फक्त मित्र आहेत. त्याने तिला कधीही घरी आणलं नव्हतं. दानिश खान हा एक हुशार आणि प्रामाणिक व्यक्ती असून त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्याला केवळ अडकवण्यात आलं आहे, असा आरोप त्यांनी केला. इतकेच नाही तर अटक करण्यात आलेला तौसीफ अत्तार हा देखील चांगला असल्याचा आणि निर्दोष असल्याचा दावा दानिशच्या आईने केला आहे.