WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 18:30 IST2026-04-18T18:29:45+5:302026-04-18T18:30:53+5:30

Manmad Railway Station Viral Video: मनमाड रेल्वेस्थानकावर एका मनोरुग्ण तरुणाने ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढून मोठा गोंधळ घातला. रेल्वे प्रशासनाने वीज पुरवठा बंद करून तरुणाला सुरक्षित खाली उतरवले. सविस्तर वृत्त वाचा.

No WWE Video from Nashik Manmad Railway station! High voltage drama at Manmad Railway Station: Man climbs overhead electric pole | WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 

WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 

मनमाड : गजबजलेल्या मनमाड रेल्वेस्थानकात शुक्रवारी (दि.१७) दुपारी एक माथेफिरू ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढल्याने अनेकांचा काळजाचा ठोका चुकला. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तत्काळ विद्युत पुरवठा बंद करत सदर माथेफिरूला खांबावरून खाली उतरविले. यावेळी काही गाड्यांचे फलाट बदलून त्या मार्गस्थ करण्यात आल्या.

मनमाड रेल्वेस्थानकात रोज दीडशे गाड्या देशभरातून येत-जात असतात. शुक्रवारी एका गाडीतून एक अंदाजे ३० वर्षे वयाचा मनोरुग्ण तरुण मनमाड स्थानकात दाखल झाला. दुपारच्या भर उन्हात अडीच तीन वाजेच्या सुमारास तो प्लॅटफॉर्मवरील छतावरून धावू लागला आणि त्यानंतर ओव्हरहेड इलेक्ट्रिकच्या खांबावर जाऊन चढला. याठिकाणी जाणारा वीज प्रवाह अति उच्च दाबाचा असतो. 

या विजेच्या तारांपासून एक-दोन फूट अंतरावर जरी माणूस गेला तरी शॉर्टसर्किट होऊन जागीच मृत्यू ओढवतो. त्यामुळे प्रसंगाचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाकडून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तात्पुरती अर्थिंग देण्यात आली. ओव्हरहेड इलेक्ट्रिक विभागाची टॉवर वॅगन मागविण्यात आली व शिडी-दोराच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांनी खांबावर चढत दोन तासांच्या प्रयत्नानंतर मनोरुग्णाला खांबावरून खाली उतरविले.

रेल्वे वाहतुकीवर परिणाम

या थरारामुळे मनमाड स्थानकावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना काही गाड्यांचे प्लॅटफॉर्म बदलण्यात आले, जेणेकरून वाहतूक विस्कळीत होणार नाही. दोन तासांनंतर या माथेफिरूला जेरबंद करण्यात आले आणि रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title : मनमाड रेलवे स्टेशन पर हंगामा: मानसिक रोगी बिजली के खंभे पर चढ़ा

Web Summary : मनमाड रेलवे स्टेशन पर एक मानसिक रूप से अस्थिर व्यक्ति बिजली के खंभे पर चढ़ गया, जिससे रेल यातायात बाधित हो गया। रेलवे अधिकारियों ने बिजली काटी और दो घंटे बाद उसे बचाया, जिससे संभावित त्रासदी टल गई।

Web Title : Manmad Railway Station Drama: Deranged Man Climbs Electric Pole, Sparks Panic

Web Summary : A mentally unstable man climbed an overhead electric pole at Manmad railway station, disrupting train traffic. Railway officials cut power and rescued him after two hours, averting a potential tragedy and causing platform changes.