Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी

याआधी २०२४ च्या हंगामात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले होते. 

By सुशांत जाधव | Updated: April 18, 2026 21:16 IST2026-04-18T21:09:39+5:302026-04-18T21:16:12+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 SRH vs CSK Abhishek Sharma Scores His Fstest IPL Fifty Against Chennai Super Kings Equals Vaibhav Suryavanshi Record | Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी

Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी

IPL 2026 SRH vs CSK Abhishek Sharma Scores His Fstest IPL Fifty : सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने शनिवारी हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. IPL कारकिर्दीतील त्याचे हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. एवढेच नाही तर सनरायझर्सच्या संघाकडून अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज  ठरला आहे. याआधी २०२४ च्या हंगामात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले होते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

वैभव सूर्यवंशीच्या या दिग्गजांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री

अभिषेक शर्मा आधी यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशी याने दोन वेळा तर २०२४ च्या हंगामात जेक फ्रेसर-मॅकगर्क याने दोन वेळा १५ चेंडूत अर्धशतक साजरे केल्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय युसूफ पठाण (२०१४ ), सुनील नरेन (२०१७), निकोलस पूरन (२०२३) यांनी IPL मध्ये अशी धमाकेदार इनिंग खेळल्याचे पाहायला मिळाले होते. 

"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक

रैना ईशान आणि प्रियांश आर्याचा विक्रम मोडला

अभिषेक शर्मानं मुंबई इंडियन्स विरुद्ध २०२४ मध्ये केलेल्या आपल्या जलद अर्धशतकासह IPL स्पेशलिस्ट सुरेश रैना (२०१४), ईशान किशन (२०२१), ट्रॅविस हेड (२०२४), प्रियांश आर्य (२०२६) यांचा १६ चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मोडीत काढला. संघाला दमदार सुरुवात करून देताना अभिषेकनं चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध २२ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने २६८.१८ च्या सरासरीसह ५९ धावांची धमाकेदार खेळी केली. जेमी ओव्हरटन याने यष्टीरक्षक संजू सॅमसनकरवी त्याच्या वादळी खेळीला ब्रेक लावला.  
 

Web Title : अभिषेक शर्मा का रिकॉर्ड अर्धशतक, दिग्गजों की सूची में शामिल

Web Summary : अभिषेक शर्मा ने सीएसके के खिलाफ 15 गेंदों में अर्धशतक जड़ा, जो एसआरएच के लिए सबसे तेज है। वह वैभव सूर्यवंशी जैसे खिलाड़ियों के साथ इस उपलब्धि को हासिल करने वाले खिलाड़ियों में शामिल हो गए, उन्होंने सुरेश रैना जैसे अन्य खिलाड़ियों के रिकॉर्ड को भी तोड़ा। उन्होंने 22 गेंदों में 59 रन बनाए।

Web Title : Abhishek Sharma's Record Fifty Joins Elite IPL Players List

Web Summary : Abhishek Sharma smashed a blistering 15-ball fifty against CSK, becoming the fastest for SRH. He joins players like Vaibhav Suryavanshi with this feat, surpassing his own previous record and others like Suresh Raina. He scored 59 runs off 22 balls.