जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 06:50 IST2026-04-19T06:49:55+5:302026-04-19T06:50:39+5:30

नाशिक शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पंचवटी परिसरातून समोर आलेल्या या संतापजनक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Allegations of forcibly taking photos and inciting torture and conversion; Panchavati police take major action | जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई

जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक: पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेत मोबाइलमध्ये जबरदस्तीने फोटो काढून त्या आधारे अत्याचार तसेच धर्मांतरास प्रवृत्त केल्याच्या कारणावरून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित तंजीर इनामदार याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी तंजीर हा वारंवार तिच्यावर बळजबरी करत होता. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध तिचे फोटो मोबाइलमध्ये काढत असे. जून २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार सुरू राहिला. या प्रकरणाची नोंद शुक्रवारी झाली असून, पोलिसांनी  पीडितेचा जबाब नोंदविला. 

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केले शोषण   

जानेवारी २०२६ मध्ये आरोपीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला एका लॉजमध्ये नेले. तेथे जबरदस्तीने मद्य सेवन करायला लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच त्याने पीडितेला गळ्यातील तुळशी माळ व हातातील धागे काढायला लावले. तिच्या धार्मिक भावना दुखावून धर्मांतराचाही प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप संशयित तंजीर याच्यावर आहे.

Web Title : नासिक: जबरन तस्वीरें, उत्पीड़न और धर्मांतरण के प्रयास में व्यक्ति गिरफ्तार।

Web Summary : नासिक में एक व्यक्ति को एक महिला की जबरन तस्वीरें लेने, यौन उत्पीड़न करने और उसका धर्म परिवर्तन कराने की कोशिश करने के आरोप में गिरफ्तार किया गया। उसने तस्वीरें जारी करने की धमकी दी, जबरदस्ती शराब पिलाई और उसकी धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाई। आरोपी पुलिस हिरासत में है।

Web Title : Nashik: Man arrested for forced photos, assault, and conversion attempt.

Web Summary : A man in Nashik was arrested for allegedly taking forced photos of a woman, sexually assaulting her, and attempting to convert her religion. He threatened to release photos, forced alcohol consumption, and insulted her religious beliefs. The accused is in police custody.