Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?

Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?

अक्षय्य तृतीयेचा योग, त्यात विवाहाचा हंगाम बघता आणि सोन्याच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता, काही लोक भलेही बोलत असतील की, सोने खरेदी शक्य नाही. परंतु सोनारांच्या दुकानातील गर्दी मात्र वेगळेच चित्र दर्शविते. आजच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर धातू स्वरूपातील वळी, चिप्स किंवा अलंकार खरेदीचे मूल्य किती कोटी रुपयांवर उडी मारते, ते बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 07:31 IST2026-04-19T07:30:44+5:302026-04-19T07:31:14+5:30

अक्षय्य तृतीयेचा योग, त्यात विवाहाचा हंगाम बघता आणि सोन्याच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता, काही लोक भलेही बोलत असतील की, सोने खरेदी शक्य नाही. परंतु सोनारांच्या दुकानातील गर्दी मात्र वेगळेच चित्र दर्शविते. आजच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर धातू स्वरूपातील वळी, चिप्स किंवा अलंकार खरेदीचे मूल्य किती कोटी रुपयांवर उडी मारते, ते बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Gold Rates: Will gold rates fall or rise further? | Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?

Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?

विनायक कुळकर्णी,
आर्थिक समुपदेशक

दीर्घ मुदतीत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याजदराबाबतचे धोरण, अमेरिका-इराण, इस्राइल-लेबनॉन तसेच रशिया-युक्रेन युद्ध यामुळे इतर देशांच्या केंद्रीय बँकांकडून वेळोवेळी केली जाणारी सोने खरेदी या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात भविष्यात सुद्धा वाढच होणे अपेक्षित आहे. ज्या-ज्या वेळी जगभरात कोविडसारखी महामारी किंवा युद्धजन्य किंवा कमालीच्या आर्थिक मंदीची परिस्थिती उद्भवते, त्या-त्या वेळी सोन्याच्या मागणीत मोठी वाढ दिसून आली आहे. परिणामी, मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त प्रमाण झाल्याने सोन्याच्या किमतीत वाढ होते. 

आखाती देशांमध्ये भू-राजकीय ताणतणाव इराणच्या हल्ल्यांमुळे वाढीस लागले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेत डॉलरवर अवलंबून असलेल्या व्यवस्थेला यानिमित्ताने धक्का देऊन ‘डि-डॉलरायझेशन’ची प्रक्रिया वाढीस लागली आहे. भारतात चलनवाढीचा फुगणारा दर, सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) झालेली एक टक्क्यांची घसरण, डॉलरच्या तुलनेत घसरत गेलेला रुपया, जागतिक स्तरावर असलेले अनिश्चिततेचे वातावरण, पश्चिम आशियातील चिघळलेली युद्धजन्य परिस्थिती आणि सणांच्या तसेच विवाह हंगामामुळे किरकोळ ग्राहकांची वाढलेली सोन्याची मागणी यामुळे सोन्याच्या दरात विशिष्ट स्तरापर्यंत वाढ होत आहे.

सध्या रु. १.५७ लाखाच्या आसपास असलेला सोन्याचा दर नजीकच्या भविष्यात मात्र रु. १.३८ लाख ते रु. १.३२ लाखांपर्यंत खाली येण्याची शक्यता बाजारात वर्तवली जात आहे. एकीकडे सोन्याच्या उत्पादनात होत असलेली घट आणि अधिकाधिक देशांच्या केंद्रीय बँकांकडून सोन्याच्या खरेदीत होत असलेली वाढ सोन्याच्या दरात नक्कीच वृद्धी करणार आहे. परंतु, काही निवडक देशांना त्यांच्या गंगाजळीतील राखीव सोने विकावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतात सोन्याचा दर या वर्षी रु. १.६५ लाख रुपयांपर्यंत चढू शकतो. मात्र, डॉलरच्या तुलनेत रुपया सशक्त झाला आणि चलनवाढीचा दर आटोक्यात राहिला तर मात्र सोन्याचा दर रु. १.२८ लाखांपर्यंत खाली उतरू शकतो.

डिजिटल, गोल्ड ईटीएफमध्ये वाढली गुंतवणूक

भारतीयांची सोन्याची आसक्ती लक्षात घेता आजही महाग झालेल्या सोन्यात गुंतवणूक करण्याचा लोकांचा मोह मात्र कमी झालेला नाही. डिजिटल किंवा गोल्ड ईटीएफच्या युनिट्समध्ये सामान्य गुंतवणूकदारांनी देखील आघाडी घेतली आहे. ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीत ३१,५६१ कोटी रुपयांची गुंतवणूक गोल्ड ईटीएफमध्ये केली आहे. धातू स्वरूपातील किंवा अलंकारात सोन्यातील गुंतवणूक जोखमीची ठरत असल्याने सामान्य गुंतवणूकदारांनी देखील गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडांच्या युनिट्सला प्राधान्य दिल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.

Web Title : सोने की कीमतें: दरें गिरेंगी या और बढ़ेंगी?

Web Summary : सोने की कीमतों में अनिश्चितता बनी हुई है। भू-राजनीतिक तनाव, केंद्रीय बैंक की कार्रवाइयां और त्योहारी मांग दरों को प्रभावित करती है। विशेषज्ञों का अनुमान है कि कीमतें ₹1.65 लाख तक बढ़ सकती हैं, लेकिन मजबूत रुपया कीमतों को ₹1.28 लाख तक कम कर सकता है। डिजिटल सोने में निवेश बढ़ रहा है।

Web Title : Gold Prices: Will Rates Fall or Rise Further?

Web Summary : Gold prices face uncertainty. Geopolitical tensions, central bank actions, and festive demand influence rates. Experts predict a potential rise to ₹1.65 lakh, but a stronger rupee could lower prices to ₹1.28 lakh. Digital gold investments are increasing.