खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 02:15 IST2026-04-19T02:12:38+5:302026-04-19T02:15:47+5:30

देशात घातपात कारवाया करण्याचा कट आखणाऱ्या चार संशयित दहशतवाद्यांना मुंबई, ठाणे, ओडिशा आणि बिहार येथून अटक करण्यात आली आहे.

4 suspected terrorists arrested in plot to attack using toy cars | खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक

खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, ओडिशा आणि बिहार येथून चार संशयित दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी देशात घातपाती कारवाया करण्याचा कट आखला होता. यातील दोन आरोपी हे गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी आयईडी बसवलेली रिमोट-नियंत्रित खेळण्याची कार तयार करत होते.

मोसैब अहमद, मोहम्मद हम्माद, मोहम्मद सोहेल आणि शेख इमरान अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ते ‘गझवा-ए-हिंद’सारख्या संकल्पनांचा प्रचार करत होते. ते ‘एन्क्रिप्टेड’ सोशल मीडिया गटांवर सक्रिय होते. 

एक आरोपी मुंबईचा, दुसरा ठाणे येथील रहिवासी

मोसैब अहमद हा उत्तर प्रदेशातील आजमगढ येथील रहिवासी असून, तो दहावीपर्यंत शिकला आहे. तो ठाण्यातील ऑटोमोबाइल वर्कशॉपमध्ये काम करत होता. 
मोहम्मद हम्माद हा मुंबईचा रहिवासी असून, तो बहि:शाल पद्धतीने बारावीचे शिक्षण घेत आहे.  शेख इमरान हा ओडिशातील असून, तो दहावीपर्यंत शिकला आहे. तो सुरक्षारक्षक आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. मोहम्मद सोहेल हा बिहारमधील कटिहारचा रहिवासी असून, तो व्यवसायाने प्लंबर आहे.

Web Title : खिलौना कार से हमले की साजिश नाकाम; चार संदिग्ध आतंकवादी गिरफ्तार।

Web Summary : दिल्ली पुलिस ने मुंबई, ठाणे, ओडिशा और बिहार से चार संदिग्ध आतंकवादियों को हमलों की साजिश रचने के आरोप में गिरफ्तार किया। दो भीड़भाड़ वाले इलाकों के लिए आईईडी से लैस रिमोट-नियंत्रित खिलौना कार बना रहे थे। संदिग्ध एन्क्रिप्टेड सोशल मीडिया पर चरमपंथी विचारधाराओं को बढ़ावा दे रहे थे।

Web Title : Terror plot foiled using toy car; Four suspects arrested.

Web Summary : Delhi Police arrested four suspects from Mumbai, Thane, Odisha, and Bihar for plotting attacks. Two were building a remote-controlled toy car with IEDs for crowded areas. Suspects promoted extremist ideologies on encrypted social media.