छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
यवतमाळच्या शिवतीर्थावर बुधवारी पहाटेपासून शिवप्रेमींनी गर्दी केली होती. पहाटेपासूनच या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे जिल्हा प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पहिले पुष्प अर्पण केले. त्यांनी शिव मॅरे ...
नाशिकरोड येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवाजी पुतळा येथे ध्वनिक्षेपकाने आवाजाची पातळी ओलांडल्याने समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी मध्यरात्र ...
महिलांनी आपल्या घरा-दारांची स्वच्छता करत सुंदर रांगोळ्यांनी दारांची सजावट केली होती. तर प्रत्येकाने घरासमोर भगव्या ध्वजाची गुडी उभी करुन मिरवणुकीचे आनोखे स्वागत केले.यावेळी कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. यामुळे आणूर गाव शिवमय झाले होत ...
सांगली जिल्'ातील खानापूर, आटपाडी, मिरज, जत, तासगाव यासह विविध तालुक्यांतील मराठी बांधव सोने-चांदी व्यवसायानिमित्त उत्तर प्रदेशात स्थायिक झाले आहेत. बुधवारी शिवजयंतीचे औचित्य साधून तेथील विविध जिल्'ात असलेले हे मराठी बांधव एकत्रित आले. त्यावेळी छत्रपत ...