प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या भावावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 18:50 IST2026-05-06T18:48:50+5:302026-05-06T18:50:54+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Mohammed Shami Brother Mohammed Kaif Accused of Deception by Woman | प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप

प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एकदा कौटुंबिक वादामुळे चर्चेत आला आहे. शमीचे वैयक्तिक आयुष्य यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात राहिले असताना, आता त्याचा धाकटा भाऊ मोहम्मद कैफ याच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. यामुळे शमीच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.

मोहम्मद कैफवर आरोप करणाऱ्या महिलेने एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. महिलेची आणि कैफची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर दोघांत मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. महिलेने जेव्हा लग्नाचा विषय काढला, तेव्हा कैफने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि प्रेमसंबंध तोडून टाकले. यानंतर महिलेने मोहम्मद शमीच्या मोठ्या भावाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला प्रतिसाद दिल्यानंतर आता त्यानेही तिचे फोन उचलणे बंद केले, असे मोहम्मद कैफवर आरोप आहेत.

कोण आहे मोहम्मद कैफ?

मोहम्मद कैफ हा शमीचा धाकटा भाऊ असून तो स्वतः एक क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथे १० डिसेंबर १९९६ मध्ये झाला. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करतो. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि मध्यम-वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १४ प्रथम-श्रेणी सामन्यात ४३ विकेट्स आणि ९ 'लिस्ट ए' सामन्यात १२ विकेट्स घेतले आहेत.

मोहम्मद शमी पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी

मोहम्मद शमीसाठी हे आरोप नवीन नाहीत. २०१४ मध्ये हसीन जहाँ सोबत विवाहबद्ध झालेल्या शमीवर २०१८ मध्ये त्याच्या पत्नीनेच कौटुंबिक हिंसाचार, हुंड्यासाठी छळ आणि अगदी मॅच-फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले. त्या काळात शमीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. आता भावावर झालेल्या आरोपांमुळे शमी पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.

Web Title : मोहम्मद शमी के भाई पर प्यार, शादी में धोखाधड़ी का आरोप

Web Summary : मोहम्मद शमी के भाई, मोहम्मद कैफ पर एक महिला ने प्यार और शादी के झूठे वादे करने के गंभीर आरोप लगाए हैं। इससे शमी के पिछले विवादों में इजाफा हुआ है, जिसमें उनकी अलग पत्नी के आरोप भी शामिल हैं। कैफ, जो खुद एक क्रिकेटर हैं, अब विवादों में हैं।

Web Title : Mohammed Shami's brother accused of love, marriage fraud.

Web Summary : Mohammed Shami's brother, Mohammed Kaif, faces serious allegations from a woman claiming deceitful promises of love and marriage. This adds to Shami's past controversies, including accusations from his estranged wife. Kaif, a cricketer himself, is now at the center of the storm.