IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा

धोनीच्या अनुपस्थितीत CSK चं दमदार कमबॅक

By सुशांत जाधव | Updated: May 6, 2026 19:16 IST2026-05-06T19:14:56+5:302026-05-06T19:16:14+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 MS Dhoni Waiting For Farewell Match Ravichandran Ashwin Doubts IPL 2026 Return | IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा

IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा

Ravichandran Ashwin On  MS Dhoni IPL Farewell Match : आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार  महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संजू सॅमसनची कामगिरी ही चेन्नई सुपर किंग्समधील MS धोनीचे पर्व संपल्याचे चित्र निर्माण करणारी आहे. ही गोष्ट चर्चेत असताना आर अश्विन याने MS धोनीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. उर्वरित सामन्यात धोनी पुनरागमनाची शक्यता कमी वाटते, असे मत चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातून खेळलेल्या आर. अश्विन याने केले आहे. जर चेन्नई सुपर किंग्सची घौडदौड सुरु राहिली तर धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही, असा दावा त्याने केला आहे.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

MS धोनीच्या फेअरवेल मॅचसंदर्भात आर. अश्विनचे मोठे वक्तव्य

रविचंद्रन अश्विन याने आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून CSK च्या ताफ्यात MS धोनीला स्थान मिळणं मुश्किल असल्याचे स्पष्ट मत मांडले. तो म्हणाला की,  "जर महेंद्रसिंह धोनी संघात परतला, तर संघाचे संतुलन  बिघडेल. त्यामुळे त्याचे पुनरागमन खूप कठीण आहे. तो पुढे म्हणाला, जर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने पुढील तीनपैकी दोन सामने गमावले तर तर धोनीला कदाचित चेन्नईमध्ये फेअरवेल सामना खेळण्याची संधी मिळू शकते."  

हार्दिक पांड्या ते शिवम दुबे! IPL 2026 मध्ये ५ स्टार खेळाडूंचा अर्धशतकी रकाना रिकामाच

धोनीच्या अनुपस्थितीत CSK चं दमदार कमबॅक

चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत प्लेऑफ्सच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकले आहे. धोनीच्या अनुपस्थितीत दमदार कमबॅक करताना चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने १० सामन्यातील ५ विजय आणि ५ पराभवासह १० गुणांची कमाई केली आहे. उर्वरित चार पैकी सर्व सामने जिंकून CSK चा संघ १८ गुणांसह प्लेऑफ्ससाठी पात्र ठरू शकतो. एका पराभवानंतरही संघाला हा डाव साध्य होऊ शकतो. 

MS धोनीसाठी शेवटचा हंगाम?

IPL स्पर्धेत गेल्या काही हंगामापासून MS धोनीच्या निवृत्तीचा मुद्दा सातत्याने चर्चेत राहिला. पण प्रत्येक हंगामात ही चर्चा फक्त अफवा ठरली. यंदाही धोनी मैदानात उतरेल, अशी अपेक्षा होती. पण दुखापतीमुळे तो एकही सामना खेळू शकलेला नाही. पण संजूच्या येलो जर्सीत धमक दाखवत धोनीचा वारसा पुढे नेण्याची धमक दाखवल्यामुळे MS धोनीसाठी हा हंगाम शेवटचा ठरेल, अशी चर्चा रंगू लागली आहे. याआधी धोनीनं चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात अखेरचा सामना खेळण्याची गोष्ट बोलून दाखवली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामातील १८ मेला तो मैदानात उतरेल, असेही बोलले जात आहे.  

Web Title : आईपीएल 2026: क्या धोनी को फेयरवेल मैच नहीं मिलेगा? अश्विन का दावा

Web Summary : अश्विन का मानना है कि धोनी की सीएसके में वापसी मुश्किल है, और अगर टीम जीतती रही तो उन्हें फेयरवेल मैच भी नहीं मिलेगा। चोट के कारण धोनी बाहर हैं, जिससे उनके भविष्य पर सवाल उठ रहे हैं।

Web Title : IPL 2026: No Farewell Match for Dhoni? Ashwin's Bold Claim.

Web Summary : Ashwin suggests Dhoni's return to CSK is difficult, potentially missing a farewell match if CSK continues winning. An injury sidelined Dhoni, raising questions about his future and Sanju Samson's performance adds fuel to discussion.