देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा काँग्रेस लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र अजून जागा निश्चिती झाले नसल्याचे सांगितले आहे. ...
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ' राहुल गांधी आता पप्पू राहिले नाहीत. ते आता गप्पू झाले आहेत'. ...
अकोला: भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला असून, या महाआघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली असून, मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दर्शविली ...
इंटरनेट आणि मोबाईलमध्ये हेरगिरी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मोदी सरकारला खड्ड्यात घालणारा आहे. सार्वत्रिक निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं हे सरकार अशा चुका करतील असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. ...
राफेल कराराबाबत भाजपाचे पदाधिकारी गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिंडोरा पिटून बालीशपणे उत्तरे देत आहेत. विमानांची वाढलेली किंमत आणि अनिल अंबानी यांच्या कंपनीबरोबर केलेल्या कराराची माहिती सर्वोच्च न्यायालय आणि संसदेपासून लपवून ठेवली आहे. ...