देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राहुल गांधींमध्ये पूर्वी दिसणारा अननुभवी राजकारणी जाऊन त्यांच्यात एक प्रभावी व गंभीर नेता असल्याचे साऱ्यांच्या लक्षात आले होते. तरीही प्रियंकांचे येणे महत्त्वाचे झाले त्याला कारण ती केवळ एक राजकीय शक्ती नसून एक प्रदीर्घ राजकीय परंपरा आहे. ...
सध्याच्या परिस्थितीत देशाला गांधीवादी विचारांची आवश्यकता आहे. देशातील सर्वधर्मसमभावाची भावना गांधीजींनी आपल्या जीवन शैलीतून व त्यागातून आपल्या देशाला दिली. त्याच विचाराची सध्या देशाला गरज आहे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी लीलाताई चितळे यांनी व्यक्त केले. ...
कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन येत्या लोकसभेत भाजपाचा दारुण पराभव करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले. ...
काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्षयात्रेच्या निमित्ताने शहरात गुरुवारी झालेल्या जाहीर सभेत बॅनरबाजीवरून स्थानिक पातळीवरील प्रकाश मुथा आणि संजय दत्त गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांना भिडले होते. ...