जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 10:57 IST2026-05-04T10:56:52+5:302026-05-04T10:57:14+5:30

Jio new recharge plan 2026 : रिलायन्स जिओने आपला लोकप्रिय ₹२०९ चा रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. या दरवाढीचा ग्राहकांवर काय परिणाम होईल आणि आता नवीन रिचार्ज प्लॅन्स कोणते आहेत, याची सविस्तर माहिती.

Jio new recharge plan 2026 : Big blow to Jio customers! Popular ₹209 plan discontinued; Now you will have to pay extra for 1GB data | जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे

जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे

मुंबई: टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठी कपात आणि दरवाढ केली आहे. ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला ₹२०९ चा रिचार्ज प्लॅन आता कंपनीने अधिकृतपणे बंद केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १GB डेटा मिळत असे.

जिओने आपल्या टॅरिफ स्ट्रक्चरमध्ये सुधारणा करताना एंट्री-लेव्हलच्या डेली डेटा प्लॅन्सवर मर्यादा आणल्या आहेत. ₹२०९ च्या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता आणि दररोज १GB डेटा मिळत असे. आता हा प्लॅन बंद झाल्यामुळे, ज्या ग्राहकांना दररोज १GB डेटा हवा आहे, त्यांना आता महागड्या प्लॅन्सची निवड करावी लागणार आहे.

नवीन पर्यायांचा विचार
₹२०९ चा प्लॅन बंद झाल्यानंतर, ग्राहकांकडे आता ₹३४९ किंवा त्यापुढील प्लॅन्सचे पर्याय उरले आहेत. कंपनीने आपल्या सरासरी प्रति ग्राहक महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते. १४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा १९८ रुपयांचा एक प्लॅन उरला आहे. जो २८ दिवसांसाठी ३९६ रुपयांना पडणार आहे. म्हणजे हा प्लॅन ३४९ दिवसांच्या २८ दिवसांच्या प्लॅनपेक्षा महागडा आहे. 

या बदलाचा कोणाला फटका बसेल?

सर्वात मोठा फटका बजेट ग्राहकांना बसला आहे. जे ग्राहक कमी किमतीत दररोज १GB डेटा वापरत होते. विशेषत: ग्रामीण वापरकर्ते ज्यांचे मोबाईल बजेट मर्यादित आहे. तसेच ऑनलाईन अभ्यासासाठी बेसिक डेटा प्लॅन वापरणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचा आर्थिक भार पडेल.

दरवाढीचे कारण?
टेलिकॉम तज्ज्ञांच्या मते, ५जी सेवांचा विस्तार आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरील वाढता खर्च भरून काढण्यासाठी जिओने आपल्या स्वस्त प्लॅन्समध्ये वाढ केली आहे किंवा ते बंद केले आहेत. येणाऱ्या काळात इतर टेलिकॉम कंपन्या (एअरटेल आणि व्हीआय) देखील अशाच प्रकारचे निर्णय घेऊ शकतात.

Web Title : जियो का ₹209 का प्लान बंद, 1GB डेटा के लिए अब अधिक भुगतान!

Web Summary : जियो ने अपना लोकप्रिय ₹209 का प्लान बंद कर दिया है, जिसमें 1GB दैनिक डेटा मिलता था। इस बदलाव से बजट उपयोगकर्ताओं, खासकर ग्रामीण क्षेत्रों और छात्रों पर असर पड़ेगा। अब 1GB डेटा के लिए ₹349 जैसे महंगे प्लान लेने होंगे, जिससे खर्च बढ़ेगा।

Web Title : Jio discontinues ₹209 plan, users to pay more for 1GB data.

Web Summary : Jio has discontinued its popular ₹209 plan offering 1GB daily data. This change impacts budget users, especially in rural areas and students relying on affordable data plans. Users now need to opt for higher-priced plans, like ₹349, for daily 1GB data, increasing their costs.