देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
बिहारमध्ये ११ जागांसाठी अडून बसलेल्या काँग्रेसने अखेर ९ जागांवर निवडणूक लढविण्यास संमती दर्शविली आहे. तसेच आपल्या दोन जागा काँग्रेस सीपीआयएमला देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
महाराष्ट्रात ४५ जागा होत्या. त्यापैकी ४२ जागा काँग्रेसने जिंकून बालेकिल्ला पुन्हा सांभाळला. नागपुरातून फॉरवर्ड ब्लॉकचे जांबुवंतराव धोटे, राजापुरात प्रा. मधू दंडवते विजयी झाले होते. पंढरपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे निवृत्ती कांबळे विजयी झाले ...
लोकसभा निवडणुका एका भीषण हल्ल्याचे भांडवल करून नव्हे तर गरीबी, आरोग्याचे प्रश्न अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर लढल्या गेल्या पाहिजेत, असे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी म्हटले आहे. ...
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचा निर्णय २२ अथवा २३ मार्च रोजी दिल्लीत होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. ...