Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:21 IST2026-04-30T14:20:25+5:302026-04-30T14:21:14+5:30
Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी याने म्हटलं आहे की, आम्हाला विनाकारण का त्रास दिला जात आहे, हेच समजत नाही.

Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
इंदूरमधील गाजलेल्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिला जामीन मिळताच हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या निर्णयावरून राजा आणि सोनमच्या कुटुंबीयांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी याने म्हटलं आहे की, आम्हाला विनाकारण का त्रास दिला जात आहे, हेच समजत नाही.
गोविंद रघुवंशीने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "आम्ही कोणताही वकील केला नव्हता आणि जामिनासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. जे काही झाले, ते न्यायालयाच्या आदेशानुसार झालं आहे." त्याने पुढे असंही स्पष्ट केलं की, त्याचा आता सोनमशी कोणताही संबंध नाही आणि ते या संपूर्ण प्रकरणातून स्वतःला वेगळं समजतात. सतत होत असलेले आरोप आणि मानसिक दबावामुळे आपली प्रकृती खालावली असल्याचं सांगत गोविंद म्हणाला की, "जर मला जास्त त्रास दिला गेला, तर मी आत्महत्या करेन."
"सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
सोनमला सुमारे ११ महिन्यांनंतर जामीन मिळाला आहे. शिलाँग न्यायालयाच्या या निर्णयामुळे सोनमला दिलासा मिळाला असला तरी, मृत राजा रघुवंशीच्या कुटुंबात मोठा संताप पाहायला मिळत आहे. राजाचा भाऊ विपिन रघुवंशी याने सांगितले की, हा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. कुटुंबाला न्यायाची अपेक्षा होती, मात्र जामीन मिळाल्याने त्यांना धक्का बसला आहे. पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांची माहिती वेळेवर दिली नाही, ज्याचा फायदा आरोपी पक्षाला न्यायालयात मिळाला, असा आरोप विपिनने केला आहे.
विपिन रघुवंशीने ठामपणे सांगितलं की, ते या निर्णयाला आव्हान देतील. "आम्ही हायकोर्टात जाऊ आणि जामीन रद्द करण्याची मागणी करू. दोषीला शिक्षा मिळायला हवी, सवलत नाही" असं त्याने म्हटलं आहे. आता हे कुटुंब ही लढाई पुढे नेण्याच्या तयारीत आहे. या संपूर्ण प्रकरणात राजाची आई उमा रघुवंशी यांची प्रतिक्रिया अत्यंत भावनिक होती.
“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
उमा रघुवंशी म्हणाल्या की, "आमचा कायद्यावर विश्वास होता, पण आता तो तुटला आहे. मला वाटतं की, या प्रकरणात पैशांचा खेळ झाला आहे आणि कुठेतरी न्यायावर परिणाम झाला आहे." त्यांनी पुढे असंही म्हटलं की, जर आरोपी मुलगी नसून मुलगा असता, तर कदाचित इतक्या सहजासहजी जामीन मिळाला नसता. उमा यांनी या प्रकरणाची फेरचौकशी करून तपास सीबीआयकडे सोपवण्याची आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
९ महिन्यांनी परतला 'राजा', रघुवंशी कुटुंबात आनंद; कामाख्या मंदिराच्या पुजाऱ्याची भविष्यवाणी ठरली खरी
राजाचे वडील अशोक रघुवंशी यांनीही न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता सिस्टमवर आपला विश्वास उरला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त, भाऊ सचिन रघुवंशी याने म्हटलं की, "आम्ही चित्रपटात ऐकलं होतं की कायद्याच्या डोळ्यावर पट्टी असते, पण आता ते खरं वाटू लागलं आहे." अशा प्रकरणांमध्ये इतक्या लवकर जामीन मिळणं अनाकलनीय असून यातून समाजात चुकीचा मेसेज जातो असं सचिनने उपरोधिकपणे नमूद केलं.