Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 17:42 IST2026-04-28T17:39:58+5:302026-04-28T17:42:45+5:30

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिला जामीन मंजूर झाला आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राजाचा भाऊ विपिन रघुवंशी याने आपला संताप व्यक्त केला आहे.

Sonam Raghuvanshi bail Raja Raghuvanshi brother Vipin Raghuvanshi reaction | Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप

Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप

राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिला जामीन मंजूर झाला आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राजाचा भाऊ विपिन रघुवंशी याने आपला संताप व्यक्त केला आहे. "सोनम आज जेलमधून बाहेर येईल, पण राज कुशवाहला जामीन मिळालेला नाही. त्याच्या जामीन अर्जावर येत्या ४-५ दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता आहे" असं विपिनने म्हटलं आहे.

"या प्रकरणात नक्की काय गेम झाला आहे हे माहित नाही, पण मला असं वाटतं की आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव झाला आहे. सध्या माझं कोणाशीही बोलणं झालेलं नाही. पाच महिन्यांपूर्वी सोनमचा भाऊ गोविंदशी माझं बोलणं झालं होतं, तेव्हा त्याने मला शब्द दिला होता की, सोनम कधीच जेलबाहेर येणार नाही आणि मी तुमच्यासोबत उभा आहे" असं विपिनने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं.

 ९ महिन्यांनी परतला 'राजा', रघुवंशी कुटुंबात आनंद; कामाख्या मंदिराच्या पुजाऱ्याची भविष्यवाणी ठरली खरी

सोनमच्या जामिनाबद्दल माहिती कशी मिळाली, यावर विपिन म्हणाला, "मी शिलाँगच्या डीएसपींना फोन करून प्रकरणाबद्दल विचारलं होत. तेव्हा त्यांनी सांगितलं की सोनमचा जामीन मंजूर झाला आहे. आता आम्ही उच्च न्यायालयात धाव घेणार असून तिचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार आहोत." ११ मे २०२५ रोजी राजा रघुवंशी आणि सोनमचं लग्न झालं होतं. २० मे २०२५ रोजी दोघेही हनिमूनसाठी मेघालयला गेले होते.

२३ मे रोजी राजा अचानक बेपत्ता झाला. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला. यानंतर सोनमने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली, ९ जून २०२५ रोजी तिला अटक करण्यात आली. सोनमने आपला बॉयफ्रेंड राज कुशवाह याच्या मदतीने ही हत्या केल्याचा आरोप आहे. राज कुशवाह हा सोनमच्या वडिलांकडे कामाला होता. या प्रकरणात सोनमसह एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली होती.
 

Web Title : सोनम को जमानत मिलने पर राजा के भाई का आरोप, पैसे से हुई हार।

Web Summary : राजा रघुवंशी हत्याकांड की मुख्य आरोपी सोनम रघुवंशी को जमानत मिलने पर राजा के भाई विपिन ने आक्रोश जताया। उन्होंने गड़बड़ी की आशंका जताई और आरोप लगाया कि पैसे से फैसला प्रभावित हुआ। विपिन जमानत को उच्च न्यायालय में चुनौती देंगे, सोनम के शुरुआती समर्थन के वादे को याद करते हुए।

Web Title : Raja's brother alleges defeat due to money after Sonam's bail.

Web Summary : Sonam Raghuwanshi, key accused in Raja's murder, gets bail, sparking outrage from Raja's brother, Vipin. He suspects foul play and alleges money influenced the decision. Vipin plans to challenge the bail in higher court, recalling Sonam's initial promise of support.