रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 16:32 IST2026-04-28T16:31:54+5:302026-04-28T16:32:49+5:30

USA Golden Dome defense project 2026 : अमेरिकेची संरक्षण व्यवस्था हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसमोर अपयशी ठरत आहे. पेंटागनने २०२७ च्या बजेट चर्चेत ही कबुली दिली असून आता डोनाल्ड ट्रम्प सरकार 'गोल्डन डोम' या नवीन संरक्षण प्रकल्पावर १८५ अब्ज डॉलर्स खर्च करत आहे.

US will not be able to defend itself if Russian, Chinese missiles arrive; Pentagon's shocking admission | रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 

रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 

वॉशिंग्टन: जगातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या संरक्षण व्यवस्थेला आता हायपरसोनिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांची धास्ती वाटू लागली आहे. "आमची सध्याची यंत्रणा केवळ छोट्या हल्ल्यांना रोखण्यासाठी बनवण्यात आली होती, ती आधुनिक हायपरसोनिक धोक्यांपुढे कुचकामी आहे," अशी धक्कादायक कबुली पेंटागनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीनेटमध्ये दिली आहे.

चीन आणि रशियाने अशी हायपरसोनिक क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत, जी आवाजाच्या वेगापेक्षा पाचपट अधिक वेगाने प्रवास करतात आणि त्यांचा मार्ग हवेत बदलता येतो. अमेरिकेची सध्याची 'थाड' आणि 'पॅट्रियट' सिस्टीम या प्रगत तंत्रज्ञानापुढे कमी पडत आहे. संरक्षण उत्पादनात गेल्या काही वर्षांत झालेल्या कमी गुंतवणुकीमुळे इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा साठा मर्यादित झाला आहे, ज्याला अधिकाऱ्यांनी 'कॅपॅसिटी डेट' असे म्हटले आहे.

'गोल्डन डोम' 
या धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली 'गोल्डन डोम' प्रकल्पावर वेगाने काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १७५ ते १८५ अब्ज डॉलर्स (सुमारे १५ लाख कोटी रुपये) खर्च अपेक्षित आहे. यामध्ये अवकाशातील सेन्सर नेटवर्क, जमिनीवरून आणि समुद्रावरून डागली जाणारी प्रगत इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित कमांड सेंटरचा समावेश असेल.

पारंपारिक क्षेपणास्त्रांशिवाय, 'लेझर' सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यासाठी केला जाईल.

'डिटरन्स + ॲक्टिव्ह डिफेन्स' रणनीती
अमेरिकेने आता केवळ 'धाक' दाखवण्याऐवजी 'सक्रिय संरक्षण' देण्याची रणनीती स्वीकारली आहे. २०२८ पर्यंत या योजनेची प्राथमिक क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, या प्रचंड खर्चामुळे अमेरिकेच्या देशांतर्गत राजकारणात वादाचे वादळ निर्माण झाले आहे.

Web Title : रूसी, चीनी मिसाइलों से अमेरिकी रक्षा प्रणाली कमजोर: पेंटागन ने स्वीकारा।

Web Summary : पेंटागन ने माना कि रूसी, चीनी हाइपरसोनिक मिसाइलों के खिलाफ अमेरिकी रक्षा कमजोर है। वर्तमान सिस्टम छोटे हमलों के लिए बनाए गए हैं। अमेरिका उन्नत तकनीक, लेजर और एआई के साथ 'गोल्डन डोम' रक्षा विकसित कर रहा है, जिसका लक्ष्य लागत चिंताओं के बावजूद 2028 तक सक्रिय रक्षा करना है।

Web Title : US defense system vulnerable to Russian, Chinese hypersonic missiles: Pentagon admits.

Web Summary : Pentagon admits US defenses are weak against Russian, Chinese hypersonic missiles. Current systems are designed for smaller attacks. The US is developing 'Golden Dome' defense with advanced tech, lasers, and AI, aiming for active defense by 2028 despite cost concerns.