UAE OPEC: अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे उद्भवलेल्या जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर United Arab Emirates (UAE) ने मोठा आणि धक्कादायक पाऊल उचलले आहे. यूएईने OPEC आणि OPEC+ या पेट्रोलियम उत्पादक देशांच्या गटांमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
स्वतंत्र निर्णय असल्याचा यूएईचा दावा
यूएईच्या ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय पूर्णपणे स्वतंत्रपणे घेण्यात आला असून सौदी अरेबिया किंवा इतर कोणत्याही देशाशी याबाबत सल्लामसलत करण्यात आलेली नाही.“आम्ही आमचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
The UAE has announced its decision to exit the Organisation of the Petroleum Exporting Countries (OPEC), effective 1 May 2026.#EmiratesNews#DubaiOneTv#News#Dubai#UAEpic.twitter.com/KW0JYaqBiz
— Emirates News (@Emirates_News) April 28, 2026
यूएई सरकारने असेही सांगितले की, हा निर्णय त्यांच्या उत्पादन धोरण, सध्याची आणि भविष्यातील क्षमता यांचा सखोल आढावा घेतल्यानंतर घेतला आहे. हा निर्णय राष्ट्रीय हित आणि बाजारातील तातडीच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तणावाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले पाऊल
इराणसोबत वाढलेल्या तणावाच्या काळात हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) देशांमध्येही तणावाचे वातावरण आहे. या गटात सौदी अरेबियाचे नेतृत्व महत्त्वाचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर UAE चा हा निर्णय OPEC साठी मोठा धक्का मानला जात आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीमुळे वाढलेली चिंता
Strait of Hormuz हा इराण आणि ओमानदरम्यानचा महत्त्वाचा जलमार्ग आहे, जिथून जगातील सुमारे २०% कच्चे तेल आणि LNG वाहतूक होते. इराणकडून सतत्या धमक्या आणि जहाजांवर हल्ल्यांमुळे आधीच तेल निर्यात अडचणीत आहे. अशात UAE चा बाहेर पडण्याचा निर्णय परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करू शकतो.
अमेरिकेसाठी सकारात्मक संकेत?
डोनाल्ड ट्रम्प यांनी OPEC वर तेलाचे दर वाढवून जगाला ‘लुटत असल्याचा’ आरोप केला होता. आता UAE चा बाहेर पडण्याचा निर्णय हा अमेरिकेसाठी सकारात्मक मानला जात आहे, कारण यामुळे OPEC कमकुवत होण्याची शक्यता आहे.
OPEC आणि OPEC+ म्हणजे काय?
OPEC ची स्थापना १९६० मध्ये तेल उत्पादन आणि दर नियंत्रणासाठी झाली होती. याचे सुरुवातीचे सदस्य देश इराक, इराण, कुवैत, सौदी अरेबिया, व्हेनेझुएला होते. तर सध्याचे सदस्य सौदी अरेबिया, UAE, इराण, इराक, कुवैत, नायजेरिया, लीबिया, व्हेनेझुएला आहेत. तसेच, OPEC+ मध्ये OPEC सदस्य + १० इतर देश आहेत. यात प्रमुख रशिया, कझाकिस्तान, मेक्सिको, ओमान इत्यादी देसांचा समावेश आहे.
दरम्यान, UAE चा OPEC आणि OPEC+ मधून बाहेर पडण्याचा निर्णय जागतिक तेल बाजारासाठी महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. यामुळे तेलाच्या किमती, पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
