कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 17:56 IST2026-04-28T17:55:04+5:302026-04-28T17:56:11+5:30

Anant Ambani Vantara: कोलंबियातील ८० हिप्पोंच्या पुनर्वसनासाठी अनंत अंबानींचे कोलंबिया सरकारला पत्र!

Anant Ambani Vantara: Colombian government to kill 80 hippos; Anant Ambani requests to send them to 'Vantara' | कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती

कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती

Anant Ambani Vantara: उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात वाढत्या हिप्पोंच्या (पाणघोडे) संख्येमुळे निर्माण झालेल्या समस्येवर सरकारने कठोर पाऊल उचलत ८० हिप्पोंना ठार करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या निर्णयावर अनंत यांनी मानवतावादी पर्याय सुचवला असून, त्या हिप्पोंना 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती केली आहे.

हिप्पोंच्या वाढत्या संख्येने पर्यावरणाला धोका

कोलंबियातील मॅग्डालेना नदी खोऱ्यात हिप्पोंची संख्या झपाट्याने वाढत आहे. या भागात सध्या सुमारे २०० हिप्पोंचे वास्तव्य आहे. या भागात नैसर्गिक भक्षक नसल्याने हिप्पोंची संख्या नियंत्रणाबाहेर गेली असून, यामुळे स्थानिक जैवविविधता आणि मानवी सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यामुळेच आता सरकारने सुमारे ८० हिप्पोंना मारण्याचा निर्णय घेतला आहे.

‘वनतारा’मध्ये पुनर्वसनाचा प्रस्ताव

दरम्यान, अनंत अंबानी यांनी या निर्णयाबाबत चिंता व्यक्त करत कोलंबिया सरकारला पर्यायी उपाय सुचवला आहे. अनंत यांनी कोलंबिया सरकारला प्रस्ताव दिला आहे की, या हिप्पोंना सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धतीने भारतात आणून त्यांचे ‘वनतारा’मध्ये पुनर्वसन करावे. नैसर्गिक अधिवास, तज्ज्ञांकडून वैद्यकीय देखभाल आणि दीर्घकालीन संरक्षण यामुळे या प्राण्यांचा जीव वाचेल.

कोलंबिया सरकारला पत्र

अंबानी यांनी कोलंबियाच्या पर्यावरण मंत्री Irene Vélez Torres यांना पत्र लिहून या योजनेचा विचार करण्याची विनंती केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होईल आणि भारत व आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले जाईल.

मानवी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज

अंबानी यांच्या मते, हे हिप्पो बदलत्या परिस्थितीचे परिणाम आहेत. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी जबाबदारीने पुढे येणे आवश्यक आहे. योग्य व्यवस्थापन आणि वैज्ञानिक नियोजनाद्वारे मानव आणि वन्यजीव यांच्यात संतुलन साधता येऊ शकते.

वनताराची तयारी पूर्ण

‘वनतारा’ने या मोहिमेसाठी सविस्तर योजना तयार केली आहे. अनुभवी पशुवैद्यकीय टीम, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉल आणि प्राण्यांसाठी अनुकूल अधिवास. तसेच, अंतिम निर्णय होईपर्यंत हिप्पोंना ठार मारण्याची प्रक्रिया थांबवण्याची विनंतीही करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मान्य झाला, तर वन्यजीव संरक्षणासाठी एक नवे उदाहरण निर्माण होईल.

Web Title : अनंत अंबानी कोलंबिया के हिप्पोपोटामस को 'वनतारा' में बचाने की पेशकश करते हैं।

Web Summary : कोलंबिया बढ़ती आबादी के कारण 80 हिप्पोपोटामस को मारने की योजना बना रहा है। अनंत अंबानी ने उन्हें अपने 'वनतारा' अभयारण्य में स्थानांतरित करने का प्रस्ताव दिया, एक मानवीय विकल्प और दीर्घकालिक देखभाल की पेशकश की, संरक्षण का आग्रह किया।

Web Title : Anant Ambani offers to rescue Colombia's hippos for 'Vantara' sanctuary.

Web Summary : Colombia plans to cull 80 hippos due to overpopulation. Anant Ambani proposed relocating them to his 'Vantara' sanctuary, offering a humane alternative and long-term care, urging conservation.