पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:56 IST2026-04-30T14:53:49+5:302026-04-30T14:56:27+5:30

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणचे ४४० किलो युरेनियम रशियात ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता, जो डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारला आहे.

Putin-Trump talk on phone; US rejects offer to give uranium to Russia! Tensions with Iran increase | पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं

पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं

इराण आणि अमेरिका यांच्यातील दशकानुशतके चाललेला संघर्ष संपवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी टाकलेला मोठा डाव फसला आहे. "इराणकडील ४४० किलो संवर्धित युरेनियम रशियाकडे सोपवा, म्हणजे अण्वस्त्रांचा धोका संपेल," असा प्रस्ताव पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला. मात्र, रशियावर विश्वास ठेवण्यास अमेरिकेने स्पष्ट नकार दिला असून, ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

काय आहे पुतिन यांची ऑफर?

ब्रिटीश वृत्तपत्र 'द डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी (२९ एप्रिल) पुतिन आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी पुतिन यांनी सुचवले की, इराणकडे असलेले ४४० किलो संवर्धित युरेनियम रशियामध्ये हलवण्यात यावे. इराण या प्रस्तावावर तयार असल्याचेही पुतिन यांनी संकेत दिले. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी नुकतीच पुतिन यांची भेट घेतली होती, त्यानंतरच हा प्रस्ताव समोर आला.

ट्रम्प यांची कडक भूमिका

पुतिन यांच्या प्रस्तावावर डोनाल्ड ट्रम्प यांनी नकारात्मक पवित्रा घेतला. ट्रम्प यांच्या मते, इराणचे युरेनियम रशियात नाही तर थेट अमेरिकेत शिफ्ट करणे हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे. रशिया आणि इराणचे संरक्षण संबंध पाहता, युरेनियम रशियाकडे सोपवणे अमेरिकेला सुरक्षित वाटत नाही. आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा संस्थेच्या मते, इराणकडे सध्या ६० टक्क्यांपर्यंत संवर्धित केलेले ४४० किलो युरेनियम आहे. जर हे ९० टक्क्यांपर्यंत संवर्धित झाले, तर इराण सहजपणे ११ अण्वस्त्रे तयार करू शकतो.

युक्रेन युद्धावरही खलबते

या संभाषणात केवळ इराणच नव्हे, तर युक्रेन युद्धावरही चर्चा झाली. ट्रम्प यांनी पुतिन यांना युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. ९ मे रोजी रशियाचा 'व्हिक्ट्री डे' असून त्यानिमित्ताने पुतिन अल्पकाळासाठी युद्धविराम जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच, पुतिन यांनी ट्रम्प यांना इशारा दिला की, जर इराणवर पुन्हा हल्ला झाला, तर युद्धाचा भडका अधिक उडेल आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल.

Web Title : पुतिन-ट्रम्प की बातचीत: अमेरिका ने यूरेनियम रूस भेजने का प्रस्ताव ठुकराया!

Web Summary : ईरान के संवर्धित यूरेनियम को रूस भेजने के पुतिन के प्रस्ताव को ट्रम्प ने सुरक्षा जोखिमों के डर से खारिज कर दिया। नेताओं ने यूक्रेन युद्ध पर भी चर्चा की, ट्रम्प ने पुतिन से संघर्ष समाप्त करने का आग्रह किया। ईरान का संभावित परमाणु हथियार विकास चिंता का विषय बना हुआ है।

Web Title : Putin-Trump call: US rejects offer to send uranium to Russia!

Web Summary : Putin's proposal to move Iran's enriched uranium to Russia was rejected by Trump, fearing security risks. The leaders also discussed the Ukraine war, with Trump urging Putin to end the conflict. Iran's potential nuclear weapon development remains a concern.