Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:53 IST2026-04-30T15:48:53+5:302026-04-30T15:53:28+5:30
Buddha Purnima 2026 Wishes: शांती, करुणा आणि अहिंसेचा वैश्विक संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त साजरी होणारी 'बुद्ध पौर्णिमा' हा दिवस मानवतेचा आणि अध्यात्माचा उत्सव आहे. या पवित्र दिनाचे औचित्य साधून आम्ही तुमच्यासाठी भगवान बुद्धांच्या महान विचारांनी प्रेरित अशी खास शुभेच्छा संदेशांची एक सुंदर फोटो गॅलरी तयार केली आहे. आपल्या प्रियजनांचे जीवन सुख आणि शांतीने उजळून टाकण्यासाठी हे शुभेच्छा संदेश आणि वॉलपेपर्स नक्की पहा आणि सोशल मीडियावर शेअर करा.

बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि आपणास आणि आपल्या परिवारास बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

भगवान बुद्धांचे अनुयायी आहात? स्वतःला तीन प्रश्न विचारा- आपण दुसऱ्यांवर किती प्रेम केले, आपण किती शांतपणे जगलो आणि आपण किती उदारपणे क्षमा केली बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते… बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना प्रकाश देऊ शकते तसेच भगवान बुद्धांचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करु शकतो बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले दुःख नाहिसे करून सुख शांती आणि समाधान देऊन जाईल अशी आशा, हृदयात व आचरणात भगवान बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे, दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे, विश्व वंदनीय भगवान बुद्ध, यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ! बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश महाल सुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश नाकारले राजपुत्र असून युद्ध असे होते तथागत भगवान बुद्ध बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

















