भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच ३० एप्रिल २०२६ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ४८ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. बुधवारी हा दर १ लाख ४७ हजार ९७३ रुपये होता, जो आज ६७९ रुपयांनी महागला आहे.
चांदीच्या दरातही वाढ:
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही आज वाढ नोंदवण्यात आली आहे. ९९९ शुद्धतेच्या चांदीची किंमत आज सकाळी २ लाख ३६ हजार ८८२ रुपये प्रति किलो झाली आहे. काल संध्याकाळी चांदीचा दर २ लाख ३६ हजार ३०० रुपये होता. म्हणजेच चांदीच्या भावात ५८२ रुपयांची वाढ झाली आहे.
कॅरेटनुसार सोन्याचे नवे दर (प्रति १० ग्रॅम):
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आजचे दर खालीलप्रमाणे आहेत:
२४ कॅरेट (९९९ शुद्धता): १,४८,६५२ रुपये
२३ कॅरेट (९९५ शुद्धता): १,४८,०५७ रुपये
२२ कॅरेट (९१६ शुद्धता): १,३६,१६५ रुपये
१८ कॅरेट (७५० शुद्धता): १,११,४८९ रुपये
साधारणपणे लोक २२, १८ कॅरेटचे दागिने खरेदी करतात. २४ कॅरेटच्या सोन्यापासून दागिने बनविता येत नाहीत. यामुळे २२ ते १८ कॅरेटमध्ये काही धातू मिक्स करून सोन्याचे दागिने बनविले जातात. यामुळे हेच दर खूप महत्वाचे असतात.
दागिने घेताना खिशाला लागणार कात्री:
लक्षात ठेवा की, 'IBJA' ने जाहीर केलेल्या या दरांमध्ये जीएसटी समाविष्ट नसतो. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष दागिने खरेदी करायला जाता, तेव्हा या किमतीवर ३% जीएसटी आणि दागिन्यांचे घडणावळ शुल्क वेगळे द्यावे लागतात. त्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्ष दुकानात हे दर थोडे अधिक वाटू शकतात.
| शुद्धता | बुधवार (संध्याकाळचा दर) | गुरुवार (आजचा सकाळचा दर) | किती महागले? |
| ९९९ सोने (२४ कॅरेट) | १,४७,९७३ | १,४८,६५२ | ६७९ रुपये |
| ९९५ सोने (२३ कॅरेट) | १,४७,३८० | १,४८,०५७ | ६७७ रुपये |
| ९१६ सोने (२२ कॅरेट) | १,३५,५४३ | १,३६,१६५ | ६२२ रुपये |
| ७५० सोने (१८ कॅरेट) | १,१०,९८० | १,११,४८९ | ५०९ रुपये |
| ९९९ चांदी (प्रति किलो) | २,३६,३०० | २,३६,८८२ | ५८२ रुपये |
