MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला

Nita Ambani Akash Ambani Sad face, MI vs SRH IPL 2026: सनरायझर्स हैदराबादने २४४ धावांचा पाठलाग करताना आठ चेंडू राखून मुंबई इंडियन्सचा केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 16:21 IST2026-04-30T16:14:43+5:302026-04-30T16:21:51+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ipl 2026 mi vs srh nita ambani akash ambani looks faces pale after Mumbai Indians embarrassing defeat | MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला

MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला

IPL 2026 MI vs SRH: यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खराब कामगिरी सुरूच आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) मुंबईचा ६ गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर सोशल मीडियावर संघमालक नीता अंबानी (Nita Ambani) आणि आकाश अंबानी (Akash Ambani) यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्टपणे दिसून येत आहे.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रायन रिकलटनने अवघ्या ५५ चेंडूत १२३ धावांची धडाकेबाज खेळी केली. मुंबई इंडियन्ससाठी हे या स्पर्धेतील सर्वात वेगवान शतक ठरले. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने २० षटकांत ५ बाद २४३ धावांचा डोंगर उभा केला. मात्र, हैदराबादच्या फलंदाजांनी हे आव्हान अगदी सहज पेलले. ट्रेव्हिस हेडने ३० चेंडूत ७६ धावांची वादळी खेळी केली, तर हेनरिक क्लासेनने ३० चेंडूत नाबाद ६५ धावा करत संघाला १८.४ षटकांतच विजय मिळवून दिला. क्लासेनला त्याच्या या कामगिरीसाठी 'सामनावीर' (Player of the Match) पुरस्काराने गौरवण्यात आले.

संघमालक हतबल, निराश

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नीता अंबानी आणि आकाश अंबानी दोघेही अत्यंत हतबल आणि निराश असल्याचे झाल्याचे दिसत आहेत. आकाश अंबानी तर शून्यात नजर लावून बसलेले दिसत आहेत. मुंबई इंडियन्सचा हा आठ सामन्यातील सहावा पराभव असून, घरच्या मैदानावर आणि प्रेक्षकांसमोर मिळालेल्या या पराभवामुळे मालकांच्या चेहऱ्यावरील हतबलता चाहत्यांच्या मनात घर करून गेली आहे. दुसरीकडे हैदराबादसाठी हा विजय महत्त्वाचा ठरला असून, ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.

Web Title : MI vs SRH: मुंबई इंडियंस की करारी हार के बाद मालिक निराश

Web Summary : मुंबई इंडियंस को सनराइजर्स हैदराबाद के खिलाफ घरेलू मैदान पर हार का सामना करना पड़ा। मैच के बाद नीता और आकाश अंबानी निराश दिखे। रिकलटन के शतक के बावजूद, हैदराबाद ने हेड और क्लासेन की शानदार बल्लेबाजी से लक्ष्य का पीछा किया।

Web Title : MI vs SRH: Disappointment for Owners After Mumbai Indians' Crushing Defeat

Web Summary : Mumbai Indians faced another defeat at home against Sunrisers Hyderabad. Owners Nita and Akash Ambani appeared visibly disheartened after the match. Despite Ricalton's century, Hyderabad chased down the target, with Head and Klassen leading their team to victory.