बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 17:27 IST2026-04-30T17:26:33+5:302026-04-30T17:27:30+5:30
Mallikarjun Kharge West Bengal Election : आता ४ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी एक्झिट पोल्समध्ये भाजप सत्ता स्तापन करताना दिसत आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काय? काँग्रेसची भूमिका काय असणार? यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Mamata Banerjee vs BJP : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपुष्टात आली आहे. यावेळी पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान झाले. या निवडणुकीत पश्चिम बंंगालच्या जनतेने अत्यंत हिरिरीने सहभाग घेतला. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यातही पहिल्या टप्प्याप्रमाणेच ९२ टक्क्यांहूनही अधिक (९२.६७) मतदान झाले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत पुरुषांपेक्षाही महिला मतदारांचा सहभाग अधिक लक्षणीय ठरला. आता ४ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी एक्झिट पोल्समध्ये भाजप सत्ता स्तापन करताना दिसत आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काय? काँग्रेसची भूमिका काय असणार? यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे -
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीवर तर सत्ताधारी तृणमूल पिछाडीवर दिसत आहे. अशा परिस्थितीत, जर पश्चिम बंगालमध्ये त्रिशंकू विधानसभा निर्माण झाली तर काँग्रेस तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देणार का? असे विचारले असता, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट शब्दांत उत्र दिले. "बघूया, आत्ताच काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. चित्र स्पष्ट होण्यासाठी आपण दोन-तीन दिवस थांबूया," असे खर्गे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या उत्तराने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
असे आहेत एक्झिट पोल्स -
बंगालमध्ये आतापर्यंत जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोल्समध्ये ममता दीदींच्या सत्तेला सुरुंग लागताना दिसत आहे. 'मॅटेराइज'च्या (MATERIZE) एक्झिट पोलनुसार, बंगालमध्ये सत्तापालट होण्याची चिन्हे असून भाजप सरकार स्थापन करू शकते. भाजपला १४६ ते १६१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून त्यांना १२५ ते १४० जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज आहे. तर इतर पक्षांना ६ ते १० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याशिवाय, 'पीपुल्स पल्स'ने तृणमूलला १७७ ते १८७ जागांसह बहुमताचा अंदाज दिला आहे. तर 'प्रजा पोल'ने भाजपला १७७ जागा मिळतील असा दावा केला आहे. पी-मार्क या एजन्सीने भाजपला १५० ते १७५ आणि टीएमसीला ११८ ते १३८ जागा मिळतील असे म्हटले आहे. चाणक्य स्ट्रॅटेजिजने देखील भाजपाला कल दिला असून ममतांना १३०-१४० आणि भाजपाला १५०-१६० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.