Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:00 IST2026-04-30T17:38:40+5:302026-04-30T18:00:22+5:30

Mumbai Water Supply Cut News: मुंबई महापालिकेतर्फे एका जलाशय बोगद्याचे काम हाती घेण्यात आल्याने मुंबईतील काही भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Mumbaikars, use water wisely! Water supply to be cut off for 30 hours in these areas from May 5; See complete list | Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी

BMC Water Shortage: मुंबईतील जलवाहिन्यांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. अमर महाल येथील नवीन जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी ५ मे पासून दक्षिण आणि मध्य मुंबईतील अनेक भागांत तब्बल ३० तासांचा पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. या काळात मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

कधी आणि किती काळ पाणीपुरवठा बंद राहणार?

अमर महाल येथून नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे खालील वेळेत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील:

सुरुवात: ५ मे (मंगळवार), सकाळी १० वाजल्यापासून.

समाप्ती: ६ मे (बुधवार), दुपारी ४ वाजेपर्यंत.

या विभागांना बसणार फटका 

पालिकेच्या माहितीनुसार, एकूण ६ विभागांमधील पाणीपुरवठा या ३० तासांच्या काळात विस्कळीत होणार आहे.

एफ/उत्तर विभाग: माटुंगा, सायन, वडाळा.

एफ/दक्षिण विभाग: परळ, शिवडी.

एल विभाग: कुर्ला, साकीनाका.

एम/पूर्व विभाग: गोवंडी, मानखुर्द.

एम/पश्चिम विभाग: चेंबूर.

एन विभाग: घाटकोपर, विद्याविहार.

नेमका काय आहे प्रकल्प?

मुंबईची पाण्याची गरज लक्षात घेता अमर महाल ते वडाळ्यातील प्रतीक्षा नगरपर्यंत एक नवीन जलवाहिनी बोगदा सुरु केला जाणार आहे. हा जल बोगदा परळ, ट्रॉम्बे जलाशय आणि पुढे तुर्भे उच्च-स्तरीय जलाशयाला जोडला जाईल. या प्रकल्पात १,८०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकली जाणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी तुर्भे येथील जलाशयांचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करावा लागणार आहे.

मुंबईतील या भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद

एफ/उत्तर विभाग: प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, सायन (पूर्व आणि पश्चिम), वडाळा ट्रक टर्मिनस, न्यू कफ परेड.

एफ/दक्षिण विभाग: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, शिवडी, ददासाहेब फाळके मार्ग, साने गुरुजी मार्ग, जेरबाई वाडिया मार्ग.

एल विभाग: कुर्ला (पूर्व), साने गुरुजी मार्ग, नेहरू नगर, शिवसृष्टी मार्ग, टिळक नगर, चुनाभट्टी.

एम/पूर्व विभाग: शिवाजी नगर, मानखुर्द, गोवंडी, देवनार व्हिलेज, चीता कॅम्प, वाशी नाका, बीएआरसी वसाहत.

एम/पश्चिम विभाग: चेंबूर गावठाण, मैत्री पार्क, सिंधी सोसायटी, टिळक नगर, माहुल गाव, सहकार नगर, पी. एल. लोखंडे मार्ग.

एन विभाग: विद्याविहार (पूर्व आणि पश्चिम), संपूर्ण घाटकोपर (पूर्व), पंत नगर, राजावाडी, रमाबाई नगर, विक्रोळी गाव.

पालिकेचे आवाहन

पाणीकपातीचा कालावधी ३० तासांचा असल्याने नागरिकांनी आदल्या दिवशीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि या काळात पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली आहे.

Web Title : मुंबई में पानी कटौती: कई इलाकों में 30 घंटे जलापूर्ति बंद

Web Summary : पाइपलाइन के काम के कारण, दक्षिण और मध्य मुंबई के कुछ हिस्सों में 5 मई से 30 घंटे की पानी कटौती होगी। बीएमसी निवासियों से पानी का संरक्षण करने और पहले से पर्याप्त आपूर्ति का भंडारण करने का आग्रह करता है क्योंकि इस व्यवधान से छह डिवीजन प्रभावित होंगे।

Web Title : Mumbai Water Cut: 30-Hour Supply Halt in Several Areas

Web Summary : Due to pipeline work, parts of South and Central Mumbai will face a 30-hour water cut starting May 5th. BMC urges residents to conserve water and store adequate supplies beforehand as six divisions will be affected by this disruption.