“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:58 IST2026-04-30T18:58:18+5:302026-04-30T18:58:18+5:30

Ravi Rana News: रवी राणा यांनी बच्चू कडू यांना विधान परिषद आणि आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या.

ravi rana made big statement that i also got an offer from eknath shinde but I am a loyal worker of devendra fadnavis | “शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा

“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा

Ravi Rana News: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. महाविकास आघाडीतील मतभेद, नाराजी आणि तिढा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तर बच्चू कडू यांनी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेत प्रवेश केला. बच्चू कडू यांनी प्रवेश करताच शिंदेसेनेकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यातच मलाही एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑफर होती, असा मोठा खुलासा रवी राणा यांनी केला आहे. 

रवी राणा यांनी बच्चू कडू यांना विधानपरिषद आणि आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेना वाढीसाठी बच्चू कडू यांना एकनाथ शिंदेंनी पक्षात घेतले, तो त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे माझ्या बच्चू कडू यांना शुभेच्छा आहेत. आता सगळ्यांनी एकत्र येऊन महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, जिल्ह्याचा विकास केला पाहिजे, अशी अपेक्षा रवी राणा यांनी व्यक्त केली. 

मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता

मला काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे, संजय राठोड, आशिष जयस्वाल यांनी सांगितलं होते की, तुम्ही शिवसेनेसोबत या पण मी त्यांना सांगितले की, मी देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता आहे, राजकारणात आहे, तोपर्यंत मी देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत निष्ठेने राहील. पण, मी महायुतीत तुमच्यासोबत आहे, असे रवी राणा यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, शिवसेना वाढवण्यासाठी बच्चू कडू यांच्यासारखा एक चांगला कार्यकर्ता त्यांना मिळाला आहे. राजकारणात कधीच टोकाची भूमिका नसते. लोकसभेमध्ये नवनीत राणांचा पराभव झाला, त्यामध्ये कोणाचा सिंहाचा वाटा होता ते जनतेला माहिती आहे, त्यामुळे जनतेने त्यांचाही हिशोब घेतला होता. आता महायुती धर्म पाळून लोकसभा विधानसभा एकत्र येऊन महायुती धर्म पाळला पाहिजे. मला बच्चू कडू चा माझ्या वाढदिवसा दिवशी फोन आला,त्या दिवशी मी त्यांना त्यांच्या शिवसेनेच्या निर्णयाबाबत शुभेच्छा दिल्या, त्यामुळे राजकीय वैर हा कधी कायम नसते, असही रवी राणा यांनी सांगितले.

 

Web Title : शिंदे ने मुझे भी प्रस्ताव दिया, पर मैं फडणवीस का निष्ठावान: रवि राणा

Web Summary : रवि राणा ने खुलासा किया कि उन्हें एकनाथ शिंदे से प्रस्ताव मिला था। उन्होंने बच्चू कडू को शिंदे की सेना में शामिल होने पर बधाई दी। राणा ने देवेंद्र फडणवीस के प्रति अपनी निष्ठा और महायुति गठबंधन के प्रति प्रतिबद्धता की पुष्टि की। उन्होंने क्षेत्रीय विकास के लिए एकता पर जोर दिया और स्थायी राजनीतिक दुश्मनी को खारिज किया।

Web Title : Shinde Offered Me Too, But I'm Loyal to Fadnavis: Ravi Rana

Web Summary : Ravi Rana revealed he received an offer from Eknath Shinde. He congratulated Bachchu Kadu on joining Shinde's Sena. Rana affirmed his loyalty to Devendra Fadnavis and commitment to the Mahayuti alliance. He emphasized unity for regional development and dismissed permanent political animosity.