“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:08 IST2026-04-30T18:03:52+5:302026-04-30T18:08:52+5:30

Deputy CM Sunetra Ajit Pawar News: मला देशाची सेवा करायची आहे, दुसऱ्या मतदारसंघात काम करेन, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.

deputy cm sunetra pawar one sentence commentary on supriya sule statement that will not fight against pawar family | “पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य

“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य

Deputy CM Sunetra Ajit Pawar News: महाविकास आघाडी एका विश्वासाच्या प्रेमाच्या नात्याने संविधान वाचवण्यासाठी एकत्रित आलेली आहे. समंजस पद्धतीने तिन्ही पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी काम करत आहेत, त्यामुळे ताटातील वाटीत आणि वाटीतील ताटात त्यापेक्षा जास्त काही नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी पवारांविरुद्ध निवडणूक लढणार नसल्याचे म्हटले आहे. यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी भाष्य केले.

गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची जी नातवंड, पवार आडनावाची आहेत, यांच्या विरोधात कधीही निवडणूक लढणार नाही. ही निवडणूक लढले नव्हते, याही निवडणुकीचा खूप इतिहास आहे. जो आता सांगणे गरजेचे वाटत नाही. मागच्या वेळेस तयारी आणि इच्छा बिलकुल नव्हती, इथून पुढेही नसणार आहे. दुसरा मतदारसंघ बघेन, मला देशाची सेवा करायची आहे, दुसऱ्या मतदारसंघात काम करेन, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. 

आमची ही सगळ्यांची तीच इच्छा आहे

जेव्हापासून मी राजकारणात आले आहे, तेव्हापासून मी नेहमी हेच सांगत आले आहे. कुटुंब आमचे वेगळे असणार आहे, सुप्रियाताईंनी सांगितलेली गोष्ट अतिशय चांगली आहे. सुप्रियाताईंनी पवार विरुद्ध पवार लढू देणार नाही हे केलेले वक्तव्य अतिशय चांगले आहे. आमची ही सगळ्यांची तीच इच्छा आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, अजितदादाच्या निधनानंतर पहिल्यांदाच नागपुरात आले आहे. इतके तापमान असताना, इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते स्वागतासाठी आले. हे केवळ दादांवर असलेले प्रेम आहे, असे सांगत सुनेत्रा पवार या अजितदादांच्या आठवणींनी भावुक झाल्या.

 

Web Title : सुप्रिया सुले पवार के खिलाफ नहीं लड़ेंगी; सुनेत्रा पवार की संक्षिप्त प्रतिक्रिया

Web Summary : सुप्रिया सुले ने पुष्टि की कि वह पवार परिवार के सदस्यों के खिलाफ चुनाव नहीं लड़ेंगी। सुनेत्रा पवार ने इस बयान का स्वागत किया और साझा भावना व्यक्त की। उन्होंने नागपुर में मिले समर्थन को भी स्वीकार किया, अजित पवार को याद किया।

Web Title : Supriya Sule Won't Fight Pawar; Sunetra Pawar Responds Briefly

Web Summary : Supriya Sule affirmed she wouldn't contest against Pawar family members. Sunetra Pawar welcomed this statement, echoing the shared sentiment. She also acknowledged the support received in Nagpur, reminiscing about Ajit Pawar.