अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 16:46 IST2026-04-30T16:46:01+5:302026-04-30T16:46:25+5:30

इराणशी संबंधित हँडला हॅक ग्रुपने २,३७९ अमेरिकन नौसैनिकांचा गुप्त डेटा लीक केला आहे.

Iran's major 'cyber strike' on US Navy! Secret data of 2,379 soldiers leaked | अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक

अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक

मध्य पूर्वेतील तणाव आता केवळ सीमेवरील गोळीबारापुरता मर्यादित राहिला नसून तो डिजिटल युद्धभूमीवर पोहोचला आहे. इराणशी संबंधित मानल्या जाणाऱ्या 'हँडला हॅक'या हॅक्टिव्हिस्ट ग्रुपने अमेरिकन नौदलावर भीषण सायबर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तब्बल २,३७९ अमेरिकन सैनिकांचा अत्यंत संवेदनशील आणि गुप्त डेटा लीक करण्यात आला असून, यामुळे अमेरिकन संरक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर धमक्यांचा पाऊस

२८ आणि २९ एप्रिल रोजी पर्शियन गल्फमध्ये तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांना व्हॉट्सअ‍ॅपवर अज्ञात क्रमांकावरून धमक्यांचे मेसेज आले. "आम्हाला माहिती आहे तुम्ही कोण आहात, तुमच्या कुटुंबाला शेवटचा फोन करून घ्या," अशा आशयाचे हे मेसेज होते. इतकेच नाही तर, इराणच्या 'शाहेद ड्रोन' आणि 'कादिर मिसाईल्स'ने हल्ला करण्याची भीतीही या मेसेजमधून घालण्यात आली. सैनिकांचे नाव, फोन नंबर, घरचा पत्ता आणि त्यांच्या खाजगी सवयींची माहितीही सार्वजनिक करण्यात आली आहे.

कोण आहे हा 'हँडला' ग्रुप?

स्वतःला पॅलेस्टाईन समर्थक म्हणवून घेणारा 'हँडला' हा ग्रुप प्रत्यक्षात इराणच्या गुप्तचर मंत्रालयाशी संबंधित असल्याचे अमेरिकन तपास यंत्रणांचे मत आहे. इराणच्या मिनाब भागातील एका शाळेवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हा सायबर अटॅक केल्याचा दावा हॅकर्सनी केला आहे. त्यांनी टेलिग्रामवर सैनिकांचा डेटा प्रसिद्ध केला असून, त्यांच्याकडे अद्याप हजारो कर्मचाऱ्यांची माहिती असल्याचा इशाराही दिला आहे.

अमेरिकेचे सडेतोड उत्तर

या सायबर हल्ल्यानंतर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "हा इराणच्या हतबलतेचा पुरावा आहे," असे म्हणत त्यांनी सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत. पेन्टागन आणि यूएस सायबर कमांडने सैनिकांना त्यांच्या वैयक्तिक उपकरणांबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. एफबीआयने हँडला ग्रुपशी संबंधित अनेक डोमेन जप्त केले असले, तरी हा ग्रुप नवनवीन नावांनी सक्रिय होत आहे.

सायकोलॉजिकल वॉरफेअर 

तज्ज्ञांच्या मते, हा केवळ डेटा चोरीचा प्रकार नसून हे एक प्रकारचे मानसिक युद्ध आहे. अमेरिकन सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे मनोबल खच्ची करण्यासाठी अशा प्रकारे वैयक्तिक माहिती लीक केली जात आहे. आता युद्ध केवळ रणांगणावर नाही, तर संगणकाच्या स्क्रीनवरही लढले जात आहे, हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

Web Title : ईरान का साइबर हमला, अमेरिकी नौसेना का डेटा लीक: सैनिक खतरे में

Web Summary : ईरान से जुड़े हैकरों ने 2,379 अमेरिकी नौसैनिकों का संवेदनशील डेटा लीक किया, जिससे तनाव बढ़ गया। सैनिकों को धमकी भरे संदेश मिले। ईरानी खुफिया से जुड़े 'हंदला' समूह ने जिम्मेदारी ली, जिसके बाद अमेरिका ने साइबर सुरक्षा बढ़ाई।

Web Title : Iran cyberattack leaks US Navy data: Thousands of soldiers exposed.

Web Summary : Iranian-linked hackers leaked sensitive data of 2,379 US Navy personnel, escalating tensions. Soldiers received threatening messages. The 'Handala' group, suspected of Iranian intelligence ties, claimed responsibility, prompting strong condemnation and cybersecurity upgrades from the US.