बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 20:23 IST2026-04-30T20:04:12+5:302026-04-30T20:23:29+5:30
Buddha Purnima Pushtipati Vinayak Jayanti 2026 Astrology: अनेक राशींसाठी मे महिन्याची सुरुवात अतिशय शानदार, धडाकेबाज, चांगला लाभ देणारी ठरू शकते, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या...

Buddha Purnima Pushtipati Vinayak Jayanti 2026 Astrology: सन २०२६ च्या मे महिन्याची सुरुवात चांगली होत आहे. ०१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन, वैशाख बुद्ध पौर्णिमा, कूर्म जयंती, पुष्टिपती विनायक जयंती आहे. तसेच या दिवशी वैशाखस्नान समाप्ती होत आहे. या विशेष योगांमुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि अद्भूत मानला गेला आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीला अनेक शुभ योग, राजयोग जुळून येत आहे. ०१ मे रोजी स्वाती नक्षत्र आणि सिद्धी योगाचा शुभ संयोग जुळून आलेला आहे. गौतम बुद्धांनी केलेले अनेक उपदेश, त्यांच्या शिकवणी किती कालातीत आहे, याचा अनुभव आजही अनेक लोकांना येतो. तर वर्षभरातील गणेश जन्मोत्सवाची सुरुवात पुष्टिपती विनायक जयंतीपासून होतो.

या दिवशी कूर्म जयंतीही असते. एकूणच ग्रहमान पाहता हा कालावधी कोणत्या राशींसाठी प्रभावी ठरू शकतो, अनुकूलता, सकारात्मकता लाभू शकते, कुटुंब, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक आघाडीवर कसा प्रभाव राहू शकेल, जाणून घेऊया...

मेष: अनेक कामे मार्गी लागतील, त्यामुळे काळजी दूर होईल. मात्र आपण थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. आहाराचे तंत्र बाळगा. परिस्थितीवर नियंत्रण राहील. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. व्यवसायात भरभराट होईल. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. मनात सकारात्मक विचार राहतील.

वृषभ: महत्त्वाची कामे आटोपून घेणे योग्य ठरेल. ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. कार्यक्षेत्रात अचानक बदलाचे वारे वाहू लागेल. कामाची जबाबदारी राहील. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. घरात ताणतणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. आरोग्याला जपा. महत्त्वाच्या योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता बाळगली पाहिजे.

मिथुन: नोकरी-व्यवसायात सतत व्यस्त राहाल. कामाचा ताण व्यवस्थितपणे हाताळला पाहिजे. कामानिमित्त प्रवास घडून येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. शैक्षणिक प्रगतिपुस्तक झळकते राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मनात सकारात्मक विचार राहतील. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील.

कर्क: विविध लाभ होतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. पगारवाढ मिळेल. सोयी-सुविधा वाढवून मिळतील, व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मात्र, आर्थिक देवाण-घेवाण थोडी काळजीपूर्वक केली पाहिजे. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्या निमित्ताने लोकांची ये-जा चालू राहील. इतरांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल.

सिंह: कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती राहील, कामाचा ताण आटोक्यात येईल. त्यामुळे हलके वाटेल. आवडत्या छंदासाठी वेळ मिळेल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. घरातील प्रलंबित कामे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील राहाल. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. तुमच्या शब्दाला किंमत दिली जाईल, धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. थोड्याच प्रयत्नात वसुली होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील.

कन्या: काही अडचणी असतील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. प्रवासात सतर्क राहा. परिस्थिती आटोक्यात येईल. अनेक अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे.

तूळ: उत्साह राहील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. नवीन उपक्रमातून फायदा होईल. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, आलेला पैसा खर्च कराल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नियमानुसार कामे करा. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. योगायोगाच्या घटना घडतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. तरुणांचा विवाह ठरेल.

वृश्चिक: महत्त्वाची कामे करून घ्यावी. कामात चालढकल करू नका. नोकरीत बदलांना सामोरे जावे लागेल. सहकारी वर्गाशी गोडीत बोलून आपली कामे करून घ्यावी. नाउमेद करणाऱ्या लोकांना शक्यतो टाळा. धनलक्ष्मीची कृपा राहील. प्रवास घडून येईल. काहींना तीर्थयात्रा घडून येईल. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. जीवनसाथीची चांगली साथ राहील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

धनु: काळजी दूर होईल. चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल. मनातील एखादी काळजी निघून जाईल. चांगली बातमी कळेल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घरी पाहुणे मंडळींचे आगमन होईल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. शैक्षणिक प्रगतीपुस्तक झळकते राहील. मुलांना अपेक्षित यश मिळेल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. सामाजिक मान-सन्मान मिळेल.

मकर: लोकांना अवास्तव आश्वासने देऊन शब्दात अडकू नका. वाहन हळू चालवा. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. परिस्थिती आटोक्यात येईल. अडचणी दूर होतील. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. काहींना पुरस्कार जाहीर होतील, मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. काहींना पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. मुलांची प्रगती होईल. नोकरीत सोयी-सुविधा वाढवून मिळतील.

कुंभ: काही कटू तर काही गोड अनुभव येतील. एकंदरीत अनुकूलता जास्त राहील. सुरुवातीला मनात उत्साह राहील. नवीन योजना आखल्या जातील. जीवनसाथीच्या कलाने घ्या. नोकरीत सोयी-सुविधा वाढवून मिळतील. संयम बाळगण्याची गरज आहे. प्रवासात सतर्क राहा. एखाद्या महत्त्वाच्या कामात विलंब व मनस्ताप होऊ शकतो. अनुकूलता राहील. शुभ फळे मिळतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल.

मीन: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. तब्येतीला थोडे जपा. गोपनीय माहिती लोकांना सांगू नका. चोरी, नुकसानीपासून सावध राहा. कामात अचानक बदल होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर लोक नाराज होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सतर्क राहा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















