दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 19:32 IST2026-04-29T19:30:07+5:302026-04-29T19:32:41+5:30

Tamil Nadu Exit Poll 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर. एम. के. स्टॅलिन यांची सत्ता टिकणार की अभिनेता विजय नवा 'किंगमेकर' ठरणार? वाचा सविस्तर निकाल.

Tamil Nadu Exit Poll 2026: MK Stalin government again in Tamil Nadu? DMK leading in exit polls; Actor Vijay's 'TVK' party makes a splash! | दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत

दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत

दोन राज्यांत सत्तांतराचे एक्झिट पोल आलेले असताना तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे देखील एक्झिट पोल समोर आले आहेत. सत्तेत असलेल्या DMK+ (द्रविड मुन्नेत्र कळघम) आघाडीला पुन्हा एकदा बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या 'द्रविड मॉडेल'वर जनतेने विश्वास दाखवल्याचे चित्र दिसत असले तरी, अभिनेता विजय याच्या TVK (तमिळगा वेत्री कळघम) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत मारलेली मुसंडी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!

केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!

विविध संस्थांनी दिलेल्या अंदाजानुसार, तामिळनाडूतील २३४ जागांचे समीकरण खालीलप्रमाणे असू शकते. 

DMK+ (सत्ताधारी): बहुतांश पोलनुसार या आघाडीला १२० ते १४५ जागा मिळतील, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा (११८) जास्त आहेत.

ADMK+ (मुख्य विरोधी): अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आघाडीला ६० ते १०० जागा मिळण्याचा अंदाज आहे. 'मॅट्रिझ'ने त्यांना सर्वाधिक १०० जागांपर्यंत मजल मारता येईल, असे म्हटले आहे.

TVK+ (अभिनेता विजय): राजकारणात पहिल्यांदाच उतरलेल्या विजयच्या पक्षाला १० ते ४० जागा मिळण्याची शक्यता आहे. 'पीपल्स इनसाईड'ने विजयच्या पक्षाला ४० जागांपर्यंत मोठा कौल दिला आहे.

विजय फॅक्टरचा फटका कुणाला?
एक्झिट पोलच्या विश्लेषणानुसार, अभिनेता विजयच्या एन्ट्रीमुळे तरुण मतदारांची मोठी फाटाफूट झाली आहे. प्रस्थापित द्रविडीयन पक्षांच्या व्होट बँकेला विजयने सुरुंग लावला असून, त्याचा फटका प्रामुख्याने ADMK आणि काही प्रमाणात DMK ला बसताना दिसत आहे.

विक्रमी मतदानाचे संकेत:
तामिळनाडूमध्ये यावेळी ८४.२९% इतके विक्रमी मतदान झाले आहे. वाढलेल्या मतदानाचा हा टक्का सत्ताविरोधी लाटेचा आहे की तरुण मतदारांच्या उत्साहाचा, हे ४ मे रोजी अधिकृत निकालानंतरच स्पष्ट होईल.

Web Title : तमिलनाडु एग्जिट पोल: DMK आगे, अभिनेता विजय की धमाकेदार एंट्री!

Web Summary : एग्जिट पोल में तमिलनाडु में DMK+ की जीत की भविष्यवाणी की गई है। अभिनेता विजय की TVK पार्टी ने मजबूत शुरुआत की, जिससे द्रविड़ पार्टियों पर असर पड़ सकता है। उच्च मतदान राजनीतिक बदलावों का संकेत है।

Web Title : Tamil Nadu Exit Poll: DMK lead, Actor Vijay makes debut impact.

Web Summary : Exit polls predict DMK+ victory in Tamil Nadu. Actor Vijay's TVK party makes a strong debut, potentially impacting established Dravidian parties. High voter turnout suggests significant shifts in political dynamics, with results due May 4th.