"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 21:10 IST2026-04-29T21:02:32+5:302026-04-29T21:10:59+5:30

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय सुरक्षा दलांवर (CRPF) गंभीर आरोप करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

I have been contesting elections since 1984 but never witnessed the kind of harassment that is taking place this time Mamata gets angry, what did she say about the victory | "मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 

"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान बुधवारी (२९ एप्रिल २०२६) पार पडले. १४२ जागांसाटी ही दुसऱ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या टप्प्यातही विक्रमी मतदान झाले. दरम्यान, भवानीपूरमध्ये मतदान केल्यानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय सुरक्षा दलांवर (CRPF) गंभीर आरोप करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "मी १९८४ पासून निवडणुका लढवत आहे. मात्र, यावेळी होतोय तसा छळ कधीही बघितला नाही," ममतांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी? -
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी १९८४ पासून निवडणुका लढवत आहे. मात्र, यावेळी ज्या पद्धतीने छळ होत आहे, तसा छळ कधी बघितला नाही. केंद्रीय दलाचे लोक आणि सेंट्रल ऑब्सर्वर मारहाण करत आहेत. त्यांनी महिला आणि लहान मुलांनाही सोडले नाही. सीआरपीएफ अशा पद्धतीने लोकांना त्रास देऊ शकत नाही. हे लोक सीमेचे रक्षण करण्याऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत." 

एवढेच नाही तर, "राणाघाट, कल्याणी आणि आरामबाग यांसारख्या ठिकाणी एजंट्सना बाहेर काढण्यात आले. हा स्वतंत्र आणि निष्पक्ष लोकशाहीचा अपमान आहे." दरम्यान, त्यांनी विजयाची खात्री देत 'विक्ट्री साइन'ही दाखवले.

"आता हिंदू जागा झाला आहेत" -
तसेच, दुसऱ्या बाजूला, भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी ममतांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "घुसखोर आणि काही विशिष्ट लोक गोंधळ करत आहेत. पण आता हिंदू जागा झाला आहेत." महत्वाचे म्हणजे, भवानीपूरमधील चक्रबेरिया येथील एका मतदान केंद्रावर ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी एकाच वेळी दाखल झाले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

बगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. १४२ जागांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे.

 

Web Title : ममता बनर्जी ने उत्पीड़न का आरोप लगाया, बंगाल चुनाव में जीत का विश्वास।

Web Summary : ममता बनर्जी, 1984 से चुनाव लड़ रही हैं, ने पश्चिम बंगाल चुनावों के दौरान केंद्रीय बलों पर मतदाताओं को परेशान करने का आरोप लगाया। उन्होंने उन पर एक राजनीतिक दल का पक्ष लेने और नागरिकों के साथ दुर्व्यवहार करने का आरोप लगाया। भाजपा के शुभेंदु अधिकारी का दावा है कि हिंदू अब जाग गए हैं। बनर्जी ने जीत के संकेत के साथ विश्वास व्यक्त किया।

Web Title : Mamata Banerjee alleges harassment, confident of victory in Bengal election.

Web Summary : Mamata Banerjee, contesting since 1984, alleges central forces harassed voters during West Bengal elections. She accuses them of favoring a political party and mistreating citizens. BJP's Suvendu Adhikari claims Hindus are now awakened. Banerjee expressed confidence with a victory sign.