Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 18:58 IST2026-04-29T18:56:33+5:302026-04-29T18:58:18+5:30
West Bengal, Kerala Exit Poll Result 2026: Axis My India आणि इतर एक्झिट पोलचे निकाल जाहीर. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुडुचेरीमध्ये कोणाची सत्ता येणार? पाहा सविस्तर व्होट शेअर आणि सीट मॅट्रिक्स.

Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
देशातील विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले असून, आसाममध्ये पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येताना दिसत आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये एक्झिट पोलच्या निकालांनी धक्का दिला असून, काही मोजक्या एजन्सींनी तृणमूल काँग्रेसला तर बहुतांश एजन्सींनी भाजपला बहुमत दिले आहे.
आसाम: भाजपचा वरचष्मा
Axis My India च्या एक्झिट पोलनुसार, आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन होण्याची दाट शक्यता आहे. NDA ला ८८ ते १०० जागा, तर काँग्रेसला २४ ते ३६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. एनडीएला ४८% मते मिळतील, जे काँग्रेसच्या ३८% पेक्षा १० टक्क्यांनी जास्त आहेत.
पश्चिम बंगाल: 'ममता दीदी' की 'दादा'?
बंगालमध्ये एक्झिट पोलच्या निकालांमध्ये मोठी तफावत आहे, ज्यामुळे निकालाचा सस्पेन्स वाढला आहे. 'पीपुल्स पल्स'ने तृणमूलला १७७ ते १८७ जागांसह बहुमताचा अंदाज दिला आहे. तर 'प्रजा पोल'ने भाजपला १७७ जागा, तर 'मॅट्रिझ'ने १४६ ते १६१ जागा मिळतील असा दावा केला आहे. पी-मार्क या एजन्सीने भाजपला १५० ते १७५ आणि टीएमसीला ११८ ते १३८ जागा मिळतील असे म्हटले आहे. चाणक्य स्ट्रॅटेजिजने देखील भाजपाला कल दिला असून ममतांना 130-140 आणि भाजपाला 150-160 जागा दाखविल्या आहेत.
पाँडीचेरी: तरुणांची 'TVK'ला साथ, ज्येष्ठांचा 'NDA'वर विश्वास
पुडुचेरीमध्ये एनडीए ४०% मतांसह आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, १८-२९ वयोगटातील ५०% पेक्षा जास्त तरुणांनी अभिनेता विजय यांच्या TVK+ पक्षाला पसंती दिली आहे, तर ६० वर्षांवरील ५२% ज्येष्ठांनी एनडीएला साथ दिली आहे.
केरळ: युडीएफला निसटती आघाडी
'वोट वाइब'च्या अंदाजानुसार केरळमध्ये सत्तांतर होऊ शकते. येथे यूडीएफला ७० ते ८० जागा मिळताना दिसत आहेत, तर सत्तेत असलेल्या एलडीएफला ५८ ते ६८ जागांवर समाधान मानावे लागू शकते.