भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 19:10 IST2026-04-29T19:10:13+5:302026-04-29T19:10:42+5:30

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने जिल्हा व सत्र न्यायालयात खरात यास व्हीसीद्वारे एसआयटीकडून हजर करण्यात आले होते.

Impostor Ashok Kharat remanded in judicial custody in seventh case; SIT takes custody in eighth case | भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा

भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा

अझहर शेख,नाशिक : महिलांवरील लैंगिक अत्याचार व जादूटोणा प्रकरणी सातव्या गुन्ह्यात भोंदू अशोक खरात यास बुधवारी (दि.२९) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य सत्र न्यायाधीश बी. एन.ईचपुराणी यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने जिल्हा व सत्र न्यायालयात खरात यास व्हीसीद्वारे एसआयटीकडून हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर एसआयटीने आठव्या गुन्ह्यात खरात याचा ताबा घेतला आहे.

स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून मंत्र-तंत्रच्या नावाखाली पीडितेला गुंगीकरक द्रव्य पाजून खरात याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला होता. 'या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास तुझ्या मुलांना मारून टाकेल, तुमचे आयुष्य उध्वस्त करेल,' अशी पिडीतेला धमकी दिली यानंतर पीडित महिलेवर तब्बल चार वेळा खरात याने बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्यास एसआयटीने अटक केली होती. दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायलयाने या गुन्ह्यात दिली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता सातव्या गुन्ह्यात न्यायालयाने पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवत न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांनी सरकारपक्षाकडून बाजू मांडली. एसआयटीने न्यायालयाकडून आठव्या गुन्ह्यात खरात यास वर्ग करुन घेत ताबा घेतला, या गुन्ह्यात पोलीस कोठडी मिळविण्यासाठी गुरुवारी (दि. २९) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title : फर्जी बाबा अशोक खरात को न्यायिक हिरासत; एसआईटी ने कब्ज़ा लिया।

Web Summary : अशोक खरात, यौन उत्पीड़न और जादू-टोना के आरोपी, को सातवें मामले में न्यायिक हिरासत मिली। एसआईटी ने आठवें मामले में हिरासत ली, जिसमें पुलिस हिरासत समाप्त होने के बाद महिलाओं के खिलाफ उनके अपराधों की आगे जांच शामिल है।

Web Title : Fake godman Ashok Kharat gets judicial custody; SIT takes over.

Web Summary : Ashok Kharat, accused of sexual assault and black magic, received judicial custody in the seventh case. SIT took custody in the eighth case, involving further investigation into his crimes against women after police custody ended.