Ryan Rickelton Record : रायन रिकल्टनच्या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने घरच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध निर्धारित २० षटकात ५ बाद २४३ धावांचा डोंगर उभारला. पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या इतिहासातील ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावंसख्या ठरली. याशिवाय रायन रिकल्टन याने एका डावात दोन मोठे विक्रम आपल्या नावे केले. मुंबई इंडियन्सकडून सर्वात जलद शतक झळकावल्यावर त्याने जे रोहित -सचिन आणि जयसूर्या यासारख्या दिग्गजांना जमलं नाही ते करून दाखवत नवा इतिहास रचला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण आफ्रिकेच्या पठ्ठ्यानं मोडला १९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड
IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात मुंबई इंडियन्सकडून वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आता रायन रिकल्टनच्या नावे झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बॅटरनं सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या डावाची सुरुवात करताना शेवटपर्यंत मैदानात थांबत मोठा डाव साधला. त्याने ५५ चेंडूत १० चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १२३ धावांची नाबाद खेळी साकारली. त्याने १९ वर्षांपूर्वीचा सनथ जयसूर्याचा विर्म मोडीत काढला. जयसूर्यानं २००८ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध MI कडून ११४ धावांची नाबाद खेळी केली होती.
MI च्या सलामीच्या नव्या प्रयोगात ‘विल पॉवर’ दिसली; पण सूर्यकुमार यादव पुन्हा फेल
मुंबई इंडियन्सकडून IPL मध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा रेकॉर्ड
- १२३* - रायन रिकल्टन विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( वानखेडे, मुंबई) (२०२६)
- ११४* - सनथ जयसूर्या, विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (वानखेडे, मुंबई) (२००८)
- ११२* - क्विंटन डी कॉक विरुद्ध पंजाब किंग्स (वानखेडे, मुंबई (२०२६)
- १०९* - रोहित शर्मा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (ईडन गार्डन्स, कोलकाता) (२०१२)
- १०५* - रोहित शर्मा विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (वानखेडे, मुंबई) (२०२४)
मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या
- २४७/९ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, २०२४ (दुसऱ्या डावात)
- २४६/५ विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद, २०२४ (दुसऱ्या डावात)
- २४३/५ विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे, २०२६
- २३५/९ विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, अबुधाबी, २०२१
- २३४/5 विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स , वानखेडे, २०२४