वानखेडेच्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सच्या नव्या सलामी जोडीनं संघाला अगदी धमाकेदार अंदाजात सुरुवात करून दिली. रायन रिकल्टन आणि विल जॅक्स जोडीनं सनरायझर्स हैदराबादच्या संघातील गोलंदाजांची धुलाई करताना पहिल्या ७ षटकात ९३ धावा कुटल्या. ही जोडी सेट झाली असताना नितीश कुमार रेड्डीनं विल जॅक्सच्या रुपात सनरायझर्स हैदराबादच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. जॅक्सचे अर्धशतक हुकले असली तरी २२ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटनं ४६ धावांच्या खेळीसह MI ची विल पॉवर वाढल्याचे संकेत दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्यकुमार मोठी खेळी करण्यात पुन्हा ठरला अपयशी
सलामी जोडी फुटल्यावर सूर्यकुमार यादव मैदानात आला. संघ मजबूत स्थितीत असताना त्याला फॉर्ममध्ये परतण्याची एक चांगली संधी होती. पण ५ चेंडूत ५ धावा करून सूर्या दादा पुन्हा एकदा स्वस्तात माघारी फिरला. त्याचा फॉर्म MI चं टेन्शन वाढवणारा आहे. सूर्यकुमार यादव याने यंदाच्या हंगामात ८ सामन्यात २०.२५ च्या सरासरीसह १४०.८६ स्ट्राईक रेटनं त्याने फक्त १६२ धावा केल्या आहेत.
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
यंदाच्या हंगामात कशी राहिलीये त्याची कामगिरी
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सलामीच्या लढतीत ८ चेंडूत १६ धावांवर त्याने आपली विकेट गमावली होती. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ३६ चेंडूत केलेल्या ५१ खेळी वगळता प्रत्येक सामन्यात तो अडखळत खेळताना दिसला. राजस्थान विरुद्ध ६ धावा केल्यावर आरसीबीविरुद्ध तो २२ चेंडूत ३३ धावांची खेळी करुन बाद झाला होता. पंजाब विरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. गुजरात टायटन्स विरुद्ध १० चेंडूत १५ धावा आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध त्याने ३० चेंडूत ३६ धावांची खेळी केली.