रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ

मुंबई इंडियन्स दमदार कमबॅक करणार का?

By सुशांत जाधव | Updated: April 29, 2026 19:22 IST2026-04-29T19:17:14+5:302026-04-29T19:22:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 MI vs SRH Mumbai Indians wins the toss and opts to bat first injured de Kock miss out along with Rohit Sharma | रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ

रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ

IPL 2026,MI vs SRH 41st Match : वानखेडेच्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादच्या संघासमोर टार्गेट सेट करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सात सामन्यात फक्त दोन सामने जिंकलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामातील प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी ही लढत महत्त्वपूर्ण लढत आहे. रोहित शर्मा अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यात यंदाच्या हंगामात MI कडून पहिला शतकवीर ठरलेला क्विंटन डी कॉक दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. या दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्स नव्या सलामी जोडीसह मैदानात उतरणार आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सलामीचा नवा प्रयोग! MS धोनीच्या गाववाल्याला मिळाली संधी 

SRH विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात MI चा संघ मोठ्या बदलासह मैदानात उतरला असून रायन  रिकल्टनच्या साथीनं विल जॅक्स MI च्या डावाची सुरुवात करताना दिसेल. या नव्या सलामी जोडीच्या प्रयोगासह संघात MS धोनीच्या गाववाल्याला अर्थात रॉबिन मिंझला संधी देण्यात आली आहे. फिनिशरच्या रुपात तो मोठी फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो.  हा डाव खेळून मुंबई इंडियन्स दमदार कमबॅक करणार का? ते पाहण्याजोगे असेल.   

IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?

मुंबई इंडियन्स  प्लेइंग इलेव्हन 

रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक फलंदाज), विल जॅक्स, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), रॉबिन मिंझ, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, एएम गझनफर, अश्वनी कुमार.

  • मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेयर-मयंक रावत, रघु शर्मा, शार्दुल ठाकूर, क्रिश भगत, राज बावा

 
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन 

अभिषेक शर्मा, ट्रॅविस हेड, ईशान किशन, हेन्री क्लासेन, सलील अरोरा (यष्टीरक्षक फलंदाज), नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्ष दुबे, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे, एशान मलिंगा

  • सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेयर  स्मरण रविचंद्रन, अनिकेत वर्मा, लायाम लिविंगस्टोन, शिवांग कुमार, हर्षल पटेल
     

Web Title: IPL 2026 MI vs SRH Mumbai Indians wins the toss and opts to bat first injured de Kock miss out along with Rohit Sharma