केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 19:12 IST2026-04-29T19:10:13+5:302026-04-29T19:12:02+5:30

Kerala Exit Poll 2026: केरळ विधानसभा निवडणूक २०२६ एक्झिट पोल: ॲक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार केरळमध्ये काँग्रेस आघाडीची (UDF) सत्ता येणार. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना धक्का बसण्याची शक्यता.

Will the 'Red Fort' collapse in Kerala? Exit polls predict a big victory for Congress-led UDF; Vijayan's 'hat-trick' will be missed! | केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!

केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!

केरळ विधानसभा निवडणुकीचे अधिकृत निकाल ४ मे रोजी जाहीर होणार असले तरी, त्यापूर्वी आलेल्या 'ॲक्सिस माय इंडिया' च्या एक्झिट पोलने डाव्यांच्या गोटात अस्वस्थता पसरवली आहे. केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची आपली जुनी परंपरा जनता कायम ठेवणार असल्याचे या कलानुसार दिसत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडीला ७८ ते ९० जागा मिळण्याचा मोठा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करून इतिहास रचण्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे स्वप्न धुळीस मिळताना दिसत आहे. सत्ताधारी LDF आघाडीला केवळ ४९ ते ६२ जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपने जोरदार प्रयत्न करूनही त्यांना केरळमध्ये केवळ ० ते ३ जागांवर समाधान मानावे लागू शकते.

विक्रमी मतदानाचा कल कुणाकडे?
९ एप्रिल रोजी केरळमधील सर्व १४० जागांसाठी मतदान झाले होते. यावेळी ७८.२७ टक्के इतके विक्रमी मतदान झाले असून, १९७७ नंतरचे हे दुसरे सर्वात मोठे मतदान ठरले आहे. या प्रचंड मतदानाचा फायदा थेट विरोधी पक्ष असलेल्या UDF ला मिळताना दिसत आहे. विशेषतः महिला मतदारांचा कल सत्तांतराच्या बाजूने असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एक्झिट पोलचा 'यूडीएफ'वर विश्वास
केवळ 'ॲक्सिस माय इंडिया'च नव्हे, तर 'पीपुल्स पल्स' आणि 'मॅट्रिझ' यांसारख्या इतर संस्थांनीही केरळमध्ये काँग्रेस आघाडीचेच (UDF) सरकार येईल, असा कल दिला आहे. त्यामुळे ४ मे रोजी केरळमध्ये खरोखरच 'हात' चालणार की 'विळा-हातोडा' आपली सत्ता टिकवणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Web Title : केरल एग्जिट पोल: यूडीएफ आगे, क्या विजयन का हैट्रिक चूकेगा?

Web Summary : केरल में एग्जिट पोल में यूडीएफ की बड़ी जीत की भविष्यवाणी, मुख्यमंत्री विजयन की लगातार कार्यकाल की उम्मीदें खतरे में। महिला मतदाताओं सहित उच्च मतदान, कांग्रेस के नेतृत्व वाले गठबंधन के पक्ष में। अन्य पोल भी इसी रुझान को दर्शाते हैं।

Web Title : Kerala Exit Polls: UDF Surges, Vijayan's 'Hat-trick' in Doubt?

Web Summary : Exit polls predict a significant UDF win in Kerala, potentially ending Chief Minister Vijayan's hopes for a consecutive term. High voter turnout, especially among women, favors the Congress-led alliance. Other polls echo this trend, suggesting a possible shift in power.