मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:06 IST2026-04-30T15:05:00+5:302026-04-30T15:06:33+5:30
Axis My India Bengal Exit Poll : प्रदीप गुप्ता (Axis My India) यांनी बंगालचा एक्झिट पोल जाहीर केला नाही. ९२.४७% विक्रमी मतदानामुळे निकालाचा सस्पेन्स वाढला आहे.

मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असतानाच, एक्झिट पोलच्या विश्वात एक मोठी खळबळ उडाली आहे. देशातील सर्वात विश्वासार्ह मानली जाणारी निवडणूक संस्था 'ॲक्सिस माय इंडिया' ने बंगालचा एक्झिट पोल जाहीर न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मतदारांच्या अनाकलनीय शांततेमुळे अचूक आकडेवारी देणे अशक्य असल्याचे सांगत एजन्सीने हा मोठा निर्णय घेतला आहे.
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
'ॲक्सिस माय इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता यांनी सांगितले की, सर्व्हे दरम्यान सुमारे ६० ते ७० टक्के मतदारांनी आपली पसंती उघड करण्यास नकार दिला. "जेव्हा जनता उघडपणे बोलत नाही, तेव्हा कोणतेही आकडे देणे चुकीचे ठरेल. चुकीच्या आकड्यांमुळे संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते, त्यामुळे आम्ही डेटा रोखण्याचा निर्णय घेतला," असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
विक्रमी मतदानाचा सस्पेन्स वाढला
दुसऱ्या टप्प्यात ९१.६६% आणि पहिल्या टप्प्यात ९३.१९% अशा विक्रमी मतदानामुळे आधीच सस्पेन्स वाढला आहे. दोन्ही टप्प्यांचे सरासरी मतदान ९२.४७% झाले असून, २०११ चा ८४.७२% मतदानाचा विक्रमही मोडीत निघाला आहे. विशेष म्हणजे महिला मतदारांनी (९२.८%) पुरुषांपेक्षा (९१.०७%) अधिक उत्साहाने मतदान केले आहे.
इतर एजन्सींचे काय आहेत अंदाज?
प्रदीप गुप्तांनी माघार घेतली असली तरी, इतर संस्थांनी आपले अंदाज जाहीर केले आहेत, ज्यात मोठी तफावत दिसत आहे.
जनमत सर्व्हे: टीएमसी १९५-२०५ (बहुमत), भाजप ८०-९० जागा.
प्रजा पोल: भाजप १७८-२०८ (बहुमत), टीएमसी ८५-११० जागा.
NDTV पोल ऑफ पोल्स: भाजप १३७, टीएमसी १५१ (कांटे की टक्कर).