महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:21 IST2026-04-30T15:21:30+5:302026-04-30T15:21:30+5:30
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला संधी देण्यात आली आहे? यादी पाहा...

महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार आहे. आमदारांच्या संख्याबळावरून विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीला ८ तर महाविकास आघाडीला केवळ १ जागा मिळणार आहे. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षांकडून कोण उमेदवार असतील, याची यादी आता समोर आली आहे.
राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली असून, आपला उमेदवार उतरवण्याचा हट्ट सोडला आहे. उद्धव ठाकरेंचा निर्णय हा मविआचाच निर्णय आहे, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताच विधान परिषदेची उमेदवारी त्यांना मिळाली. भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आधीच उमेदवार जाहीर केले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी...
भाजपाकडून विधान परिषदेसाठी उमेदवार (पोटनिवडणुकीसह)
- सुनील कर्जतकर
- माधवी नाईक
- संजय भेंडे
- विवेक कोल्हे
- प्रमोद जठार
- प्रज्ञा सातव
शिंदेसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवार
- नीलम गोऱ्हे
- बच्चू कडू
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर उमेदवार
- झिशान सिद्दीकी
महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे उमेदवार
- अंबादास दानवे