म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 21:34 IST2026-04-30T21:34:14+5:302026-04-30T21:34:40+5:30

प्रकल्पातील सदनिकांना प्रती सदनिका १ वाहन तळ (पार्कीग) विना मुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

MHADA reduces the prices of 1221 houses in the lottery by 7-5 percent | म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या

म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या

मुंबई : म्हाडाच्या लॉटरीमधील २६४० सदनिकांपैकी विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १२२१ सदनिकांच्या किंमतीत ७.५ टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत.

संकेत क्रमांक ५३८, बिल्डींग नं. २  अ,ब पॉकेट- २, कन्नमवार नगर, विक्रोळी येथील ४८० सदनिकांची किमंत १,४५,५८,३०७ ते १, ४७, ९७, ९९२ व  संकेत क्रमांक – ५३९ बिल्डींग नं. ३ अ, ब, क पॉकेट क्र. २ कन्नमवार नगर, विक्रोळी येथील ७४१ सदनिकांची किमंत १,४५,७४,९४२ ते १,४८,१४,९०१ अशी आहे. या संकेत क्रमांकातील सदनिकांची विक्री किमंत प्रती सदनिका ७.५ टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला ३० मार्च रोजी सुरुवात करण्यात आली होती. अधिकाधिक नागरिकांना सोडत प्रक्रीयेत सहभाग घेता यावा याकरिता मंडळातर्फे  १४ मे पर्यंत मुदत वाढ जाहीर करण्यात आली आहे.

सुधारित किंमती पुढीलप्रमाणे...संकेत क्र.५३८, बिल्डींग नं. २  अ,ब पॉकेट- २, कन्नमवार नगर, विक्रोळी येथील ४८० सदनिकांची किमंत १,३४,६६,४३४ ते १,३६,८८ १४३ व संकेत क्रमांक ५३९ - बिल्डींग नं. ३ अ,ब,क पॉकेट क्र. २ कन्नमवार नगर, विक्रोळी येथील ७४१ सदनिकांची किमंत १,३४,८१ ८२१ ते १,३७,०३,७८३ अशी सुधारीत करण्यात येत आहे.

प्रकल्पातील सदनिकांना प्रती सदनिका १ वाहन तळ (पार्कीग) विना मुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Web Title : म्हाडा ने लॉटरी में घरों की कीमत 7.5% घटाई

Web Summary : म्हाडा ने कन्नमवार नगर, विक्रोली में लॉटरी के 1221 फ्लैटों की कीमत 7.5% कम की। ऑनलाइन आवेदन की अंतिम तिथि 14 मई तक बढ़ाई गई है। संशोधित कीमतें ₹1,34,66,434 से ₹1,37,03,783 तक हैं। प्रत्येक फ्लैट में मुफ्त पार्किंग शामिल है।

Web Title : MHADA Reduces Housing Prices by 7.5% in Lottery

Web Summary : MHADA has slashed prices by 7.5% for 1221 flats in Kannamwar Nagar, Vikhroli, part of its lottery. The online application deadline is extended to May 14th. Revised prices range from ₹1,34,66,434 to ₹1,37,03,783. Each flat includes free parking.